Stop hair loss | केस गळतीवर रामबाण उपाय | जाणून घ्या केसांसाठी आवश्यक खनिजे (Mineral)..

आजच्या धकाधकीच्या जीवनात केस गळणे ( hair loss ) ही मोठी समस्या बनलेली आहे जी सर्व वयोगटातील व्यक्तींना लागू पडते. आज आपण वेगवेगळे शांपु, तरल पदार्थ, घरघुती आयूर्वेदीक उपचार करतो त्यामध्ये बऱ्याचदा प्रमाण कमी-जास्त प्रमाण झाल्याने त्याचा वेगळाच परिणाम होण्याची शक्यता असते आणि कितीही झाले तरि हे वरवरचे उपाय तकलादू असतात त्याला (केसाला) मूळापासून पोषण देण्यास असमर्थ ठरतात. परंतु केस गळण्याच्या  ( hair loss ) समस्येला बरेच घटक कारणीभूत आहेत, आतून व बाहेरून डोक्याची निरोगी त्वचा ( scalp ) निरोगी राखण्यासाठी खनिजांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. केस गळती ( hair loss ) रोखण्यात भूमिका बजावणाऱ्या महत्त्वपूर्ण खनिजांची आवश्यकता खालीलप्रमाणे सांगता येईल.

 

hair loss

लोह – फॉलिक्युलर फंक्शनला इंधन देणे:

लोह हे एक महत्त्वाचे खनिज आहे जे हिमोग्लोबिनच्या उत्पादनात मदत करते, ही प्रथिने शरीराच्या पेशींपासून तर केसांच्या फॉलिकल पर्यंत ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करते. अपुर्‍या लोहामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, केसांच्या वाढीवर परिणाम होतो आणि केस गळतात ( hair loss ). तुमच्या शरीरात लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि केसांना निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या आहारात पालक, मसूर आणि चरबी नसलेले मांस यासारख्या लोहयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.

झिंक – केसांच्या फॉलिकलचे संरक्षक:

hair loss

झिंक हे एक पॉवरहाऊस खनिज आहे जे केसांच्या फॉलिकल सोबतच इतर पेशींची दुरुस्तीआणि देखभाल करते आणि यामुळे हे खनिज महत्वाचे आहे. हे केसांच्या फॉलिकलच्या आसपासच्या तेल ग्रंथींचे नियमन करण्यास मदत करते परिणामी केस गळती ( hair loss ) थांबण्यास मदत होते. भोपळ्याच्या बिया, काजू, उडीद, चना, राजमा, किवी, तीळ, मांस यांसारखे पदार्थ हे तुमच्या फॉलिकलला मजबूत करण्यासाठी आणि केस टिकवून ठेवण्यासाठी झिंकचे उत्कृष्ट स्रोत आहेत.

बायोटिन – एक सुंदर जीवनसत्व:

hair loss

या जीवनसत्वाला “सुंदर जीवनसत्व” असेही म्हणतात याला कारणही तसेच आहे, केसांमुळे सौंदर्य अधिकच खुलते आणि निरोगी केसांसाठी बायोटिन  ( biotin )  हे अतिशय महत्त्वाचे आहे. याला व्हिटॅमिन बी 7 असेही म्हणले जाते, हे केसांच्या निरोगी वाढीसाठी अत्यंत आवश्यक असलेले, पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. बायोटिन हे केराटिनच्या उत्पादनास मदत करते, या प्रोटीनमुळे केसांचा संरचनात्मक पाया बनते. बायोटिन सप्लिमेंट्स घेणे किंवा तुमच्या आहारात अंडी( पिवळा भाग ), बदाम, मशरूम आणि रताळे यांसारख्या नैसर्गिक स्रोतांचा समावेश केल्याने बायोटिन ची आवश्यकता पूर्ण होईल ज्यामुळे केसांची निगा राखण्यास मदत होईल.

तांबे – केस पिकणे थांबवते आणि केसाची जाडी वाढवते:

तांबे हे अत्यावश्यक खनिज आहे जे केसांचे नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठी आणि अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे कोलेजनच्या वाढीसाठी देखील मदत करते, एक प्रोटीन जे केसांच्या strands ना संरचनात्मक आधार प्रदान तर करतेच पण केस सरळ आणि जाड ठेवण्यासाठी देखील मदत करते. ऑयस्टर, नट आणि बिया, ओट्स, सोयाबीन,पालक यांसारखे पदार्थ तांब्याचे समृद्ध स्रोत आहेत.

व्हिटॅमिन डी – निरोगी फॉलिकल्ससाठी आवश्यक:

hair loss

“सनशाईन व्हिटॅमिन” म्हणून ओळखले जाणारे, व्हिटॅमिन डी निरोगी केसांच्या फॉलिकल्स निरोगी राखण्यास महत्त्वपूर्ण आहे. हे केसांच्या वाढीचे चक्र सक्रिय ठेवण्यास मदत करते आणि केसगळती ( hair loss ) रोखण्यात देखील महत्त्वाचे आहे. हे मिळवण्यासाठी सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवणे, तुमच्या आहारात फॅटी फिश, फोर्टिफाइड डेअरी उत्पादने आणि मशरूम यांसारख्या व्हिटॅमिन डी-युक्त पदार्थांचा समावेश करणे ज्यामुळे तुमच्या केसांना आतून पोषण मिळते.

मजबूत आणि तेजस्वी केसांसाठी आवश्यक खनिजांकडे लक्ष देणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. लोह, जस्त( zinc), बायोटिन, तांबे आणि व्हिटॅमिन डी यांचा समावेश असलेला संतुलित आहार केसगळती रोखण्यात आणि केसांच्या आरोग्यास चालना देण्यासाठी खूप मदत करू शकते. लक्षात ठेवा, तुमच्या केसांना आतून बाहेरून पोषण देणे हे तुमच्या केसांसाठी तसेच तुमचे व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी तेवढेच आवश्यक आहे.

Leave a comment

केस गळती रोखण्यासाठी 5 महत्त्वाची खनिजे.. स्टॉक मार्केटवर आधारित आठ सर्वकालीन प्रसिद्ध पुस्तके..