EVM machine prize | एका EVM मशीन ची किंमत किती असते? जाणून घ्या EVM वापरणे का आवश्यक आहे..

भारतातील EVM मशिनद्वारे (EVM machine ) इलेक्शन म्हणजे जगभरात सर्वात जास्त चर्चेचा विषय असतो. याला कारण म्हणजे भारतामध्ये असलेली लोकशाही आणि आपली प्रचंड लोकसंख्या. एवढ्या लोकसंख्येच्या देशात निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणे हे अतिशय किचकट व अवघड काम आहे. इतर देशांना याबाबतीत खूप नवल वाटत असावे म्हणून तर याबाबतीत विदेशी मिडीया याबाबतीत अनेक डॉक्युमेंटरीज्  बनवतात.

EVM Machine
भारतामध्ये 1990 पर्यंत पूर्णपणे पेपर बॅलेट द्वारे मतदान होत असे परंतु हे बॅलेट पेपर छापणे आणि पोलिंग बूथ पर्यंत सुरक्षितपणे पोहोचवणे हे अतिशय अवघड होऊन बसले होते. यादरम्यान बूथ कॅप्चरिंग होणे व बॅलेट पेपर चोरीस जाऊन त्याचा दुरुपयोग होणे अशा घटना पण फार मोठ्या प्रमाणात होत असल्याने (खासकरून 1950 ते 1980 पर्यंत) EVM मशिनच्या ( EVM machine ) निर्मिती बाबत निर्णय घेतला गेला ECIL ( electronic corporation of India ) आणि BEL ( Bharat electronics ) यांना EVM निर्मितीचे कार्य दिले गेले. 1990 पासून वेगवेगळ्या फेज मध्ये यांचा वापर वाढत गेला आणि शेवटी 2004 च्या निवडणुकीत यांचा वापर संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात करण्यात आला. 2024 च्या निवडणुकीत जवळपास 11.8 लाख पोलिंग बूथ उभारले गेले आणि त्यामध्ये EVM मशिनची संख्या पण प्रचंड होती.

* एका मतदान युनिटची किंमत किती असते. ( EVM machine price )

EVM Machine

प्रत्येक पोलिंग बूथवर सरासरी दोन मतदान युनीट लागत असल्याने व वेळेवर खराब झाल्यास स्टॉक म्हणून राखीव ठेवण्यासाठी निवडणुक आयोगाच्या अंदाजानुसार

46,75,100 BU ( ballet unit )
36,72,000 VVPAT

आणि त्याच प्रमाणात कंट्रोल युनिटची आवश्यकता असते. प्रत्येकांची किंमत साधारणतः खालील प्रमाणे असते.

बॅलेट युनिट – 7900 /-
कंट्रोल युनिट – 9800/-
VVPAT – 16000 /-

वरील आकडे 2023 मधील खर्चावर आधारित आहे. तथापि, आर्थिक बाबतीत विचार करायचा झाल्यास, यामध्ये वाहतुकीची गुंतागुंत मोठ्या प्रमाणात आहे. पुरेसे मतदान आणि सुरक्षा कर्मचारी, EVM machine साठी विस्तारित स्टोरेज सुविधा आणि अतिरिक्त वाहने ही निवडणूक                     आयोगासमोरील मोठी आव्हाने आहेत. शिवाय, नवीन मशिन्सचे उत्पादन आणि गोदाम सुविधांच्या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण अडथळे निर्माण होतात, त्यामुळे आयोगाने असा अंदाज लावला की पहिल्या एकाचवेळी निवडणुका 2029 मध्येच होऊ शकतात. यासोबतच वन नेशन वन इलेक्शनची कल्पना बऱ्याच जणांकडून मांडली जात आहे परंतु ही अमलबजावणी करण्यासाठी घटना दुरुस्तीची आवश्यकता असल्याने या बाबतीत वाद-विवाद दिसून येतात कारण सर्व पक्ष यासाठी तयार होतीलच असे नाही. यामुळे निवडणूक खर्चामध्ये प्रचंड प्रमाणात बचत होईल हे नक्की. प्रत्येक मशीनची शेल्फ लाइफ 15 वर्ष असते, असे केल्याने प्रत्येक 15 वर्षात यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला EVM साठी जवळपास 10 हजार कोटींचे बजेट आखावे लागेल. जे की आताच्या तुलनेत फार कमी असेल. यामुळे प्रत्येक मशीन तीन लोकसभा व सोबतच विधानसभा आणि इतर निवडणुका पार पडेपर्यंत उपयोगातील येईल.

* EVM वापर खरंच आवश्यक आहे का ? ( Why EVM is important )

EVM Machine

बरेच जण म्हणतात की ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो त्यामुळे ईव्हीएमचा वापर बंद करणे आवश्यक आहे. परंतु जर ईव्हीएम शिवाय मतदान करायचे झाल्यास त्यासाठी होणारा खर्च EVM machine पेक्षाही प्रचंड असेल आणि जिथे घोटाळ्याची गोष्ट आहे तर अगोदर सुद्धा बूथ कॅप्चरिंग होणे, बॅलेट पेपरवर स्टॅम्प करून मोठ्या प्रमाणात मतदान पेटीत टाकणे अशा गोष्टी होतच असत.

बरेचजण म्हणतात की बाकी कोणत्याच देशांमध्ये मशीनचा वापर होत नाही तर भारतात का? तर याचे उत्तर सर्वांना ठाऊक आहे ते म्हणजे भारतातील प्रचंड लोकसंख्या आणि वेगवेगळ्या फेजेस मध्ये होणारे मतदान. संपूर्ण युरोप ची लोकसंख्या 74 कोटी आहे, एकट्या अमेरिकेची 34 कोटी, ऑस्ट्रेलियाची तर फक्त 4 कोटी आहे. तर मग इतर देशांची व भारताची तुलना तरी कशी होऊ शकते या शिवाय चिठ्ठयांची प्रत्यक्ष मोजणी करणे यासाठी देखील खूप वेळ लागतो याचा पण विचार करायला हवा.

Leave a comment

केस गळती रोखण्यासाठी 5 महत्त्वाची खनिजे.. स्टॉक मार्केटवर आधारित आठ सर्वकालीन प्रसिद्ध पुस्तके..