आज जगात शस्त्रास्त्रांची एक स्पर्धाच लागलेली आहे, यामधे प्रत्येक देश एकमेकांपेक्षा कसा वरचढ होईल यासाठी सतत प्रयत्न करीत असतो. संरक्षण क्षेत्रावर खर्च करण्याच्या बाबतीत भारत अग्रगण्य देश म्हणून ओळखला जातो. इतर देशासोबत असलेले चांगले संबंध आणि भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली छवी यामुळे भारताला नवनवीन टेक्नॉलॉजी व सहकार्य मिळत आलेले आहे. भारत आणि रशियाचे मित्रत्वाचे संबंध आपण जाणतोच, हे संबंध आता अजूनच दृढ होत आहे कारण रशियाच्या सहकाऱ्याने भारत हा जगातील सर्वात वेगवान (Fastest missile) क्षेपणास्त्र बनवण्याच्या बाबतीत सक्षम होणार आहे ज्याचे नाव आहे ब्रह्मोस 2.
ब्रह्मोस (BrahMos)-2 किंवा ब्रह्मोस( BrahMos) मार्क II ही एक Fastest Hypersonic cruise missile आहे जे सध्या भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि रशियाच्या NPO मशिनोस्ट्रोयेनिया यांच्या संयुक्त विकासाखाली आहे, ज्यांनी एकत्रितपणे BrahMos Aerospace Private limited ही संस्था स्थापन केलेली आहे. क्रूझ क्षेपणास्त्रांच्या ब्रह्मोस मालिकेतील ही दुसरी आवृत्ती आहे. ब्रह्मोस-II ची क्षमता 1500 किलोमीटर आणि Mach 8 चा वेग असणार आहे. ही Missile स्क्रॅमजेट एअरब्रीथिंग जेट इंजिनद्वारे चालवले जाईल. या क्षेपणास्त्राची उत्पादन किंमत आणि इतर माहितीचा तपशील अद्याप प्रकाशित केलेली आहे.
ब्राह्मोस-II ची नियोजित Operational Range सुरुवातीला 290 किलोमीटरपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली होती कारण रशिया क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्था (MTCR) वर स्वाक्षरी करणारा देश आहे, ज्याने इतर देशांना 300 किलोमीटर पेक्षा जास्त श्रेणीची क्षेपणास्त्रे विकसित करण्यास मदत करण्यास मनाई आहे. तथापि, 2014 मध्ये भारत MTCR स्वाक्षरीकर्ता देश बनल्यानंतर, BrahMos 2 साठीचे मापदंड वाढवले जातील. त्याची सर्वोच्च गती सध्याच्या ब्रह्मोस-I पेक्षा दुप्पट असेल व Operational Range ही 1500 किलोमीटर असेल आणि सध्या जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र म्हणून त्याचे वर्णन केले जाते आहे.
याची चाचणी 2020 मध्ये सुरू करण्याचे नियोजित होते, परंतु अगोदरच याला विलंब झाला आहे. चौथ्या पिढीतील बहुउद्देशीय रशियन नौदल विनाशक (प्रोजेक्ट 21956) देखील ब्राह्मोस II ने सुसज्ज असण्याची शक्यता आहे.
Brahmos 2 ची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत,[wpdatatable id=1]
भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ ब्रह्मोस एरोस्पेसने या क्षेपणास्त्राला BrahMos II (K) असे नाव दिले आहे.
1 एप्रिल 2023 रोजी प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, भारताने रशियाला रशियन 3M22 झिरकॉन हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे (Zircon hypersonic cruise missile) तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे ज्यावर ब्रह्मोस-II (K) आधारित असेल, ज्याला रशियाने कथितपणे सहमती दर्शविली आहे परंतु रशिया आणि चीन मधील जवळचे संबंध आणि या Missile ने भारताला मिळणारे सागरावरील प्रभुत्व यामुळे सध्या तरी ही technology हस्तांतरित केलेली नाही.