gold in smartphone | आपल्या स्मार्टफोन मध्ये होतो चक्क सोन्याचा वापर, जाणून घ्या तुमच्या फोनमध्ये किती सोनं आहे..

आज एखादा सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा चांगला स्मार्टफोन ( smatphone ) घेऊ शकतो. साधारणतः पाच ते सहा हजारापासून स्मार्टफोनची किंमत सुरू होते. आणि प्रत्येक ब्रँडनुसार याची किंमतपण वेगवेगळी असू शकते. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, या मोबाईल मध्ये अशी कोणती वस्तू वापरली जाते ज्यामुळे याची किंमत कमी जास्त असते. याचे उत्तर सोपं आहे. मोबाईल मध्ये वापरल्या जाणाऱ्या पार्टसची क्वालिटी जेवढी चांगली, तेवढं त्या मोबाईलचं नाव. उदाहरण म्हणून Apple कंपनीचे आयफोनच ( iphone ) बघा, एखाद्या व्यक्तीकडे आयफोन दिसला की तो व्यक्ती नक्कीच चांगल्या घरचा असेल असे वाटू लागते कारण आहे त्याची किंमत आणि क्वालिटी.

gold in smartphone
परंतु तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की प्रत्येक फोन मध्ये सोने ( gold ) , चांदी ( silver ) आणि इतर मौल्यवान धातूंचासुद्धा उपयोग केला जातो. यामध्ये सर्वात जास्त सोने या धातूचा वापर होतो त्या खालोखाल चांदी प्लॅटिनम ( platinum ) आणि पोलॅडियम ( polladiaum ) असे धातू वापरले जातात. याला कारण आहे या धातूचा गुणधर्म ज्यामध्ये गंज ( corrosion ) न लागणे व इलेक्ट्रिकल सिग्नल  ( electricals signals ) वाहून नेण्याची त्यांची अद्भुत क्षमता, म्हणून फोनच्या सर्किटमध्ये त्याचा सर्रास वापर दिसून येतो. प्रत्येक ब्रँड व मॉडेल नुसार कमी जास्त प्रमाणात हे धातू वापरले जातात. साधारणतः ॲपल कंपनीच्या मोबाईल मध्ये या धातूंचा वापर इतर ब्रँड च्या तुलनेत जास्त प्रमाणात केला जातो. कदाचित म्हणूनच या कंपनीचे फोन्स आपल्या कॉलिटी साठी जगभरात नावाजलेले आहेत.

आता हे सोनं काढण्याचा जर आपण प्रयत्न केला तर ते आपल्याला शक्य होणार नाही कारण त्याला विशेष प्रकारची प्रक्रिया करावी लागते. मुख्यतः सर्किटमध्ये कोटींगच्या स्वरूपात सोन्याचा वापर होतो आणि हे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे अशा बऱ्याच स्मार्टफोनवर प्रक्रिया करावी लागेल जे की खूप खर्चिक असेल. एका अहवालानुसार एक ग्राम सोने मिळवण्यासाठी चक्क 40 स्मार्टफोनस् लागतात.

gold in smartphone
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं किती प्रमाणात सोने ( Gold ) व इतर मौल्यवान धातू आपल्या फोनमध्ये वापरले जाते ( gold in smartphone ) ? तर बघा, सरासरी 0.034 ग्रॅम सोने आपल्या स्मार्टफोन मध्ये वापरले जाते. हे प्रमाण सरासरी असल्यामुळे काही फोन्समध्ये प्रमाण जास्त पण असू शकते. या व्यतिरिक्त चांदी, प्लॅटिनम, पोलॅडियम हे धातू सुद्धा कमी जास्त प्रमाणात वापरले जातात. यामधील पोलॅडीयम हा धातू तर सोन्यापेक्षा महाग आहे. हे सर्व धातू त्यांच्या वेगवेगळ्या गुणधर्मामुळे इलेक्ट्रॉनिक डिवाइसमध्ये वापरणे अनिवार्य असते.
हे मौल्यवान धातू फक्त स्मार्टफोनमध्येच वापरतात असे नाही तर जेवढे काही इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहेत जसे की लॅपटॉप सुपर कम्प्युटर, टॅबलेटस्, स्मार्टटीव्ही या सर्वांमध्ये यांचा वापर होतो. जेणेकरून त्त्यांची क्षमता अधिकाधिक विकसित केली जाते. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स डिवाइसची स्क्रॅपिंग ( पार्टस वेगवेगळे करून त्यांच्या पुनर्वापर करणे ) इंडस्ट्री खूप जोमाने वाढत आहे. यामुळे ॲपल कंपनी तर त्यांच्या जुन्या फोन्सना एक्सचेंज ऑफर च्या नावाने चांगली किंमत पण देते.

Leave a comment

केस गळती रोखण्यासाठी 5 महत्त्वाची खनिजे.. स्टॉक मार्केटवर आधारित आठ सर्वकालीन प्रसिद्ध पुस्तके..