झोप ही एक अत्यंत महत्त्वाची गरज आहे, पण चांगली झोप लागण्यासाठी जगातील लोक ना ना प्रकारच्या टिप्स वापरतात. सांस्कृतिक परंपरांपासून ते वैयक्तिक सवयींपर्यंत, वेगवेगळ्या देशातील लोकांनी झोपेच्या अनोख्या टिप्स विकसित केल्या आहेत, त्यामुळे त्यांची वेगवेगळी जीवनशैली दिसून येते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये चांगली झोप (Healthy Sleep) लागने हे एक गरजेची गोष्ट झालेली आहे व त्यामध्ये मोबाईल व इतर गॅजेट्स यांच्या सवयीमुळे रात्री उशिरापर्यंत जागणे आणि पर्यायाने झोप कमी होणे यामुळे चांगल्या झोपेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. चांगल्या झोपेसाठी जगातील अशाच वेगवेगळ्या भागात वापरत असलेल्या टिप्स पाहूया.
1 ब्रिटिश लोक नग्न झोपतात.
युनायटेड किंगडममधील 30 टक्के लोक नग्न झोपणे निवडतात असे एका सर्व्हेमधून बाहेर आले आहे. कपड्यांशिवाय झोपने केवळ आरामदायकच नाही तर आरोग्यासाठी फायदेशिरदेखील (Healthy Sleep) आहे. नग्न झोपल्याने शरीराच्या तापमानाचे नियमन करण्यात मदत होते आणि हवेचा संचार पण चांगला राहतो, ज्यामुळे रात्रीची झोप अधिक शांत होते.
2. ग्वाटेमालामधील काळजीवाहू बाहुल्या.
ग्वाटेमाला या देशातील लोक आपल्या मुलांच्या उशाखाली काळजी बाहुल्या ठेवतात जेणेकरून त्यांच्या मुलांना अंधारात कुणीतरी आपल्या सोबत आहे आणि मुले त्यांच्या मनातील भीती, काळजी त्या बाहूलींना सांगतात जेणेकरून झोपताना त्यांच्या मनात कोणतीही काळजी व भीती राहत नाही. आपल्या मुलांना चांगली झोप लागावी म्हणून हा अनोखा उपाय आहे. काळजीच्या बाहुल्या छान रंगबिरंगी धाग्यांनी बनवलेल्या असतात,व त्या झोपण्यापूर्वी उशीखाली ठेवल्या जातात आणि असे मानले जाते की ते झोपलेल्या व्यक्तीची चिंता दूर करतात.
3. जर्मन लोक स्वतंत्र ब्लँकेट वापरतात.
जर्मनीमध्ये, जोडप्यांना त्यांच्या एकाच बेडवर स्वतंत्र ब्लँकेट वापरण्याची प्रथा आहे. पारंपारिक एकाच ब्लँकेटच्या उलट , वैयक्तिक ब्लँकेट वापरणे व्यक्तीला त्यांच्या स्वत:च्या झोपेच्या प्रकारानुसार सोयीचे होते, यामुळे व्यक्तीला त्यांच्या सोयीनुसार झोपेवर नियंत्रण ठेवता येते. म्हणून तेथील जोडपे एकाच बेडवर वेगवेगळी पांघरुण वापरतात.
4. चिनी त्यांचे पाय धुतात.
चीनमधील लोक झोपण्यापूर्वी आपल्या पायाची मसाज करतात जेणेकरून पायातील स्नायू शिथिल होतात व दिवसभराचा थकवा निघून जातो ज्यामुळे झोप छान लागते, व तेथील लोक दररोज आपले पाय काही वेळेस कोमट पाण्यात ठेवतात ज्यामुळे शरीरात रक्ताभिसरण चांगले होते असे मानले जाते व त्यामुळे झोपही लवकर लागते.
5. जपानी लोक डुलकी घेतात.
जपानमध्ये, डुलकी घेणे सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य आहे आणि चांगले देखील आहे असे ते मानतात.तेथील 40 टक्के लोक सामान्यपणे डुलकी घेतात असे एका सर्व्हेमध्ये दिसून आले आहे. Inemuri (इनमुरी) म्हणून ओळखली जाणारी ही पद्धत इथे प्रसिद्ध आहे यामध्ये प्रवास करताना किंवा कामाचा ठिकाणी देखील डुलकी घेणे ही एक सामान्य बाब आहे जिथे इतर देशात डुलकी घेणे म्हणजे आळसपणाचे लक्षण मानतात तिथे या देशात डुलकी घेणे ही उत्पादकता वाढवण्यासाठी फायदेशीर व एक आरोग्यदायी सवय (Healthy Sleep) आहे असे मानले जाते.
6. अमेरिकन जोडपे स्वतंत्रपणे झोपतात.
स्वतंत्र पांघरून वापरण्याच्या जर्मन प्रथेच्या विरोधात, काही अमेरिकन जोडपे वेगळ्या बेडवर किंवा अगदी वेगळ्या बेडरूममध्ये झोपणे निवडतात. हा ट्रेंड, ज्याला काहीवेळा Sleep divorse (स्लीप डिव्होर्स) म्हणून संबोधले जाते, ते व्यक्तींना त्यांच्या झोपेच्या पद्धतीला प्राधान्य देण्यास आणि घोरणे किंवा वेगवेगळ्या झोपेचे वेळापत्रक यासारख्या समस्यांचे निराकरण करण्यास स्वातंत्र्य देते. अपारंपरिक असले तरी, दोन्ही जोडीदारांना त्यांना आवश्यक असलेली विश्रांती मिळेल याची खात्री करून व त्यामुळे त्यांच्यामध्ये निरोगी नातेसंबंधांमध्ये निर्माण करण्यास योगदान देतात.
7. कॅनेडियन त्यांच्या पाळीव प्राण्यांसह झोपतात.
कॅनडामध्ये, अनेक लोकांना त्यांच्या पाळीव प्राण्यांसोबत अंथरुणावर झोपणे हे फार आवडते. ज्यामधे तेथील लोक आपल्या केसाळ पाळीव प्राण्यांना सोबत घेऊन झोपतात ज्यामुळे त्यांना उबदारपणा तर मिळतोच परंतु आपल्या पाळीव प्राण्यांसोबत एक भावनात्मक नाते टिकून राहते असे ते मानतात.
अशाप्रकारे चांगली झोप लागणे एक अत्यंत गरजेची गोष्ट आहे व त्यासाठी जगभरातील लोक वेगवेगळ्या पद्धती वापरतात कारण चांगली झोप हे एक चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे हे आपण जाणतोच.