भारतीय लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे! ज्यांना कोणाला विदेशामध्ये एखादी टूर काढायची असेल त्यांच्यासाठी ही एक महत्वाची बातमी आहे कारण हेन्ली पासपोर्ट इंडेक्सने ( Henley Passport Index 2024 ) अलीकडेच भारताला जागतिक स्तरावर 82 व्या स्थानावर ठेवले आहे, फेब्रुवारी 2024 मध्येच भारत 85 स्थानी होता, भारताने अवघ्या महिनाभरातच 3 स्थानची झेप घेतली हे विशेष. ज्यामुळे भारतीय पासपोर्ट धारकांना वेगवेगळ्या देशात फिरण्यासाठी अधिक प्रवासाचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. या रँकिंगचा अर्थ असा आहे की भारतीय आता किचकट व्हिसा अर्जांच्या त्रासाशिवाय 62 देशांना भेट देऊ शकतात.
हेन्ली पासपोर्ट इंडेक्स ( Henley Passport Index 2024 ) हा जागतिक स्तरावर पासपोर्टची क्रमवारी ठरवणारी एक सुप्रसिद्ध प्राधिकरण संस्था आहे. सर्वात शक्तिशाली पासपोर्ट असलेले शीर्ष सहा देश आहेत ज्यामध्ये फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन आहेत, याउलट, अफगाणिस्तान या यादीत सर्वात तळाशी आहे, यानुसार अफगाणिस्तान मधील पासपोर्ट धारकांना व्हिसाशिवाय केवळ 28 देशांमध्ये प्रवेश आहे यामध्ये बांग्लादेश 101 व्या स्थानावर असून 42 देश तर पाकिस्तान हा 106 व्या क्रमांकावर येतो जिथे त्यांना 34 देशामध्ये विजामुक्त प्रवेश मिळतो.
भारतीय पासपोर्ट धारक आता ओमान आणि कतार सारख्या ठिकाणांसह 62 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेशाचा आनंद घेऊ शकतात. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार हे देश एकतर व्हिसाशिवाय प्रवेश देतात किंवा भारतीय प्रवाशांसाठी व्हिसा-ऑन-अरायव्हलची (visa on arrival) सुविधा देतात.
आगाऊ व्हिसा न मिळवता भारतीय आता ज्या देशांना भेट देऊ शकतात त्यांची संपूर्ण यादी येथे आहे:
अंगोला
ब्रिटिश व्हर्जिन बेट
बुरुंडी
कंबोडिया
केप वर्दे बेटे
कोमोरो बेटे
कुक बेटे
जिबूती
डोमिनिका
एल साल्वाडोर
इथिओपिया
फिजी
गॅबॉन
ग्रेनेडा
गिनी-बिसाऊ
हैती
इंडोनेशिया
इराण
जमैका
जॉर्डन
कझाकस्तान
केनिया
किरिबाती
लाओस
मकाओ (SAR चीन)
मादागास्कर
मलेशिया
मालदीव
मार्शल बेटे
मॉरिटानिया
मॉरिशस
मायक्रोनेशिया
मोन्सेरात
मोझांबिक
म्यानमार
नेपाळ
नियू
ओमान
पलाऊ बेटे
कतार
रवांडा
सामोआ
सेनेगल
सेशेल्स
सिएरा लिओन
सोमालिया
श्रीलंका
सेंट किट्स आणि नेव्हिस
सेंट लुसिया
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स
टांझानिया
थायलंड
तिमोर-लेस्टे
त्रिनिदाद
टोबॅगो
ट्युनिशिया
तुवालु
वानूआतू
झिंबाब्वे
टोगो
बार्बाडोस
भूतान
हेन्ली पासपोर्ट इंडेक्स ( Henley Passport Index 2024 ) सर्वात मजबूत पासपोर्ट असलेले शीर्ष सहा देश हायलाइट करते, ज्यांना व्हिसा-मुक्त किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल विशेषाधिकारांद्वारे 194 देशांमध्ये विजामुक्त प्रवेश करता येते. फिनलंड व इतर काही युरोपियन देश दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने पासपोर्ट धारकांना व्हिसाशिवाय 193 देशांमध्ये प्रवेश दिला आहे.
युनायटेड स्टेट्स सहाव्या स्थानावर आहे, ज्याने आपल्या नागरिकांना व्हिसा जटिलतेशिवाय 189 देशांमध्ये प्रवेश दिला आहे. जागतिक स्तरावर टॉप सर्वात शक्तिशाली पासपोर्टमध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर, स्पेन, फिनलंड, दक्षिण कोरिया, स्वीडन, ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड, नेदरलँड, बेल्जियम, लक्झेंबर्ग, नॉर्वे, पोर्तुगाल, युनायटेड किंगडम, ग्रीस, माल्टा, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, झेकिया, न्यूझीलंड, पोलंड, कॅनडा, हंगेरी, युनायटेड स्टेट्स, एस्टोनिया, लिथुआनिया, लॅटव्हिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया आणि आइसलँड यासारख्या देशांचा समावेश आहे.
हेन्ले पासपोर्ट इंडेक्समध्ये ( Henley Passport Index 2024 ) भारताची 82 व्या क्रमांकावर झेप ही एक महत्त्वाची प्रगती आहे, ज्यामुळे भारतीय नागरिकाला 62 राष्ट्रांमध्ये विना अडथळा प्रवेश मिळतो ज्यामध्ये मागील वर्षी समाविष्ट झालेल्या श्रीलंका, केनिया आणि थायलंड मुळे ही रंकिंग रॅकिंग प्राप्त होण्यास मदत झाली. यामुळे प्रवासात देशाचा वाढता जागतिक प्रभाव दिसून येतो यामुळे हळूहळू का होईना आपला देश जागतिक पातळीवर वरच्या स्थानावर जाण्याचा प्रयत्न करत आहे.