How to improve IQ | मुलांच्या बुध्यांक (IQ) वाढीसाठी प्रसिद्ध जपानी पद्धती..

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला वाटते की आपला पाल्य इतरांपेक्षा वरचढ रहावा व त्याकरिता प्रत्येक पालक प्रयत्न करत असतात. पण तरीही भारतातील मुलांपेक्षा विदेशातीन मुले बऱ्याच गोष्टीत वरचढ ठरतात. याला कारणीभूत आहे तेथील शिक्षण पद्धती जिथे मुलांचा सर्वांगीण विकास व त्यांचा बुद्ध्यांक वाढण्यासाठी असलेल्या विशिष्ट पद्धती. बुद्ध्यांकावर आनुवंशिकता आणि वातावरणाचा देखील प्रभाव पडतो, मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी उत्तेजक आणि आश्वासक वातावरण तयार करणे आवश्यक असते.

How to improve IQ

जगामध्ये जपानची प्रगती तर सर्वश्रुत आहे, अवघ्या महाराष्ट्राएवढा देश व त्यामानाने प्रचंड लोकसंख्या , कमी नैसर्गिक संसाधने असूनसुद्धा तो देश जगात चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून प्रसिद्ध आहे कारण आहे तेथील शिस्त, लोकांची मेहनत आणि त्यांचा बुद्ध्यांक. आपल्या मुलांच्या बुद्ध्यांक वाढीसाठी ( How to improve IQ ) जपानी जीवनपद्धती कडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत जेणेकरून आपणही आपल्या मुलांच्या बुद्ध्यांक वाढीसाठी ह्या गोष्टीचा अवलंब करू शकतो. चला तर जाणून घेऊया बुद्ध्यांक वाढीसाठी काही जपानी टिप्स

1. कुतूहल आणि शोध घेण्यासाठी प्रोत्साहन देणे..

जपानी संस्कृतीत तेथील लोकं आपल्या मुलांमध्ये लहानपणापासूनच कुतूहल निर्माण करणे आणि कोणत्याही गोष्टीचा स्वतःहुन शोध घेण्याच्या प्रक्रियेला विशेष महत्त्व देतात. मुलांनी प्रश्न विचारने, परिसराचे निरीक्षण करणे, मुलांना विविध क्रियेमध्ये गुंतवून ठेवणे, त्यांना क्रियाशील ठेवण्यासाठी निसर्ग सहल, म्युझियम ल भेट देणे, एकमेकांशी संवाद करणारे गेम खेळणे इत्यादी गोष्टीचा यात समावेश आहे.

2. शिस्त आणि एकाग्रता.

How to improve IQ

मुलामध्ये स्वयं-शिस्त व वेळेचे व्यवस्थापन करणे आणि कोणतेही काम एकाग्र होऊन करण्यासाठी प्रोत्साहन देणे. काय करायचे आहे हे स्पष्ट ठरवून, त्यासाठी एक रूटीन तयार करणे आणि वेळोवेळी मार्गदर्शन व मदत करणे हे तिथल्या संस्कृतीचा भाग आहे.

3. कठीण मेहनत घ्यायला शिकवणे.

जपानमधील लोक यशासाठी प्रयत्न आणि चिकाटीवर भर देतो. मुलांला प्रगतिशील विचार करायला शिकवतात जेणेकरून कोणत्याही समस्येवर कठीण परिश्रम व चिकाटीने मात करता येते याचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो.

4. शिक्षणासाठी पोषक वातावरण तयार करणे.

जपानमधील लोक शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देतात. मुलांना घरी अभ्यास करण्यासाठी विशेष जागा तयार करून देतात. गृहपाठासाठी वेळापत्रक तयार करून देतात आणि आपल्या कृतींद्वारे शिक्षणाचे महत्त्व मुलांना पटवून देतात.

How to improve IQ

5. वाचनाची आवड निर्माण करणे.

जपानमध्ये वाचनाला खूप महत्त्व आहे. ते आपल्या मुलांना पुस्तकांच्या सानिध्यात ठेवतात व एक दिनचर्या बनवून देतात. मुलांना विविध विषयांवरचे पुस्तक वाचण्यासाठी प्रोत्साहन देतात. ही सवय मुलांच्या बुद्ध्यांक वाढीसाठी ( How to improve IQ ) खूप फायदेशीर ठरते.

6. समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करणे.

जपानी संस्कृतीत सर्जनशीलता आणि समस्या सोडविण्याला विशेष महत्त्व आहे. ते मुलाला चिकित्सक विचार करण्यास, नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी आणि कोणत्याही समस्येला प्रगतीची संधी म्हणून पहाण्यास प्रोत्साहित करतात.

7. निरोगी जीवनशैलीच्या सवयींना प्रोत्साहन देणे.

How to improve IQ

निरोगी जीवनशैली ही निरोगी विचारांचे द्वार आहे असे ते मानतात. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि मर्यादित स्क्रीन टाईम यांना ते प्रोत्साहन देतात.  या पद्धतींचा अवलंब करून, तुम्हीपण तुमच्या मुलाच्या बौद्धिक विकासाला चालना देणारे आश्वासक वातावरण तयार केल्याने त्यांच्या बुद्ध्यांक निश्चितच वाढेल  ( How to improve IQ ) यात शंका नाही.

Leave a comment

केस गळती रोखण्यासाठी 5 महत्त्वाची खनिजे.. स्टॉक मार्केटवर आधारित आठ सर्वकालीन प्रसिद्ध पुस्तके..