टाटा मोटर्स, ऑटोमोटिव्ह उद्योगातील एक प्रमुख ब्रँड आहे, त्याची रोमांचक अशी नवीन SUV, टाटा पंच (Tata Punch) या मॉडेलचे इलेक्ट्रिक (EV) वर्जन लवकरच लाँच करण्याच्या तयारीत आहे टाटा च्या वेबसाईटवर त्याबद्दल प्रथामोल माहितीपण देण्यात आली आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज असलेली ही गाडी टाटाच्या EV सेगमेंट मध्ये अजून एका मॉडेलची भर घालणार आहे. आणि हे मॉडेल गेम चेंजर असणार आहे, याला कारणही तसेच आहे, आपल्या वर्गातील सर्वात परवडणारी, पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV म्हणून, Tata Punch EV भारतीय EV बाजारपेठेतील मोठा वाटा काबीज करण्याच्या तयारीने, विशेषत: Citroen eC3, या EV शी थेट स्पर्धा करणार आहे. ग्राहक अधिकाधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्यायांकडे वळत असताना टाटामोटर्सचे चे हे मॉडेल एक सर्वोत्तम पर्याय म्हणून उपलब्ध होणार आहे.
या मोडेलची अधिकृत लॉन्च करण्याची तारिख अजून जाहीर होणे बाकी असताना, TATA Punch EV च्या लॉन्चिंग ची आस लोकांना लागली आहे. तज्ञांचा असा अंदाज आहे की TATA Punch EV मध्ये त्याच्या अगोदर लाँच झालेल्या, Tiago EV आणि Tigor EV च्या तुलनेत थोडा मोठा बॅटरी पॅक असेल व ही कार ARAI-प्रमाणित सुमारे 300 ते 600 किमीची अतुलनीय रेंज ऑफर करेल. आधुनिक ड्रायव्हिंग च्या वाढत असलेल्या गरजा पूर्ण करून त्याला फास्ट चार्जिंग ( fast charging ) देखील उपलब्ध केले जाणार आहे जे की 10 मिनिटात 100 km ची वाढवू शकेल.
TATA Punch EV चे इतर वैशिष्ट्य म्हणजे त्यात LED प्रोजेक्टर हेडलाइट्स, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, आणि Arcade.ev ॲप सूट सोबतच अत्याधुनिक टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 360° कॅमेरा, 6 एअरबॅग, समोरच्या बोनेट मध्ये सुध्दा टोरेजसाठी जागा, मल्टिपल व्हॉईस असिस्टंट, प्राइज् सेगमेंटनुसार sunroof ऑप्शन इत्यादी फीचर उपलब्ध करून दिली आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे मिश्रण व सुविधा देण्यासाठी टाटा मोटर्सची ही कार सुसज्ज आहे. टिकाऊपणा या सोबतच अधिक sefety सह टाटा च्या लोगोने सुशोभित केलेल्या नवीन दोन-स्पोक स्टीयरिंग व्हीलचा समावेश देखील यामध्ये आहे. यामुळे ड्रायव्हिंगच्या अनुभवाला अत्याधुनिकतेचा स्पर्श मिळेल.
आपल्या EV लाइनअपसाठी एक वेगळी ओळख निर्माण करण्याच्या हालचालीमध्ये, Tata Motors नवीन ब्रँड ओळख म्हणून Tata.ev अंतर्गत ईव्ही रिटेल शोरूम्स स्थापन करण्याची तयारी करत आहे. यामुळे बदलत्या काळामध्ये कंपनीची आधुनिकतेकडे वाटचाल दिसून येते. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वेगाने बदल होत आहे. लोक अधिकृत लॉन्चची आतुरतेने वाट पाहत असताना, टाटा मोटर्सने EV लँडस्केपमध्ये प्रगती करणे सुरूच ठेवले आहे, 2025 पर्यंत दहा EV चा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे टाटा मोटर्सने मोबिलिटीच्या भविष्यात एक धाडसी पाऊल उचलले आहे असे दिसून येते.