Ola S1X and Ola S1X plus | ओला ने लॉन्च केल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्स, असणार सर्व अत्याधुनिक फीचर.

आज बाजारात नावाजलेल्या कंपन्यांनी नवनवीन  इलेक्ट्रिक स्कूटर चे मॉडेल्स लॉन्च केलेल्या आहे जसे की bajaj, TVS, Hero अशा कंपन्याचा यामध्ये समावेश आहे. परंतु या कंपन्या व्यतिरिक्त इतरही काही कंपन्या जसे एथर ATHER, OLA ने खूप कमी वेळेमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर च्या बाबतीत मार्केट मध्ये धुमाकूळ माजवला आहे आणि नावाजलेल्या कंपन्यांना पुरून उरल्या आहेत आता OLA ने इतर सर्व लहान इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आपले दोन नवीन मॉडेल OLA S1X  आणि OLA S1X+ ( Ola S1X and Ola S1X plus ) बाजारात लॉन्च केले आहे. आतापर्यंत ओला ने लॉन्च केलेल्या सर्व गाड्यांपैकि सर्वात स्वस्त गाड्या असणार आहेत.

OLA S1X and OLA S1X plus

कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त सुविधा या गाड्यांमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. चला तर मग जाणून घेऊया या दोन्ही गाड्यांचे मुख्य वैशिष्ट्ये..

वैशिष्ट्ये Ola S1X Ola S1X+
Range 95 / 143 151
Top speed 90 km/h 90 km/h
Charging time 7.4 hrs 6 hrs
Battery 2 kWh /3 kWh 3 kWh
Battery warranty 8 years 8 years
Key type Physical Key Keyless unlock
Display 4.3 inch 5 inch
Price (on-road) 84,999 Rs 79,999 Rs

 

Ola S1X आणि S1X plus या दोन्ही गाड्यांचे वजन 108 kg आहे हे विशेष.

या दोन्ही गाड्यांवर ( Ola S1X and Ola S1X plus ) मिळणाऱ्या इतर सुविधा खालीलप्रमाणे आहेत.

1 या दोन्ही गाड्यांमध्ये बॅटरीवर 8 वर्ष किंवा 80 हजार किलोमीटरची वॉरंटी मिळणार आहे. यामध्ये जे अगोदर होईल ते गृहीत धरल्या जाईल.

2 बाकीच्या सर्व पार्ट्सवर 3 वर्ष किंवा 40 हजार किलोमीटर ची वॉरंटी लागू असेल.

3 अतिरिक्त 5000 रुपये देऊन ही वॉरंटी 1 लाख किलोमीटर पर्यंत किंवा 13000 रुपये देऊन 1 लाख 25 हजार किलोमीटर पर्यंत वाढवन्याची सुविधा ग्राहकांना असेल.

Ola S1X and Ola S1X plus

4 गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा डिफेक्ट, बॅटरी व्यवस्थित काम करत नसल्यास किंवा गाडीची रेंज अचानक कमी झाल्यावर लगेच बदलून दिली जाणार आहे. यामध्ये संपूर्ण बॅटरी किंवा रीपेयर करून ते देऊ शकतात.

5 इतर पेट्रोल स्कूटर पेक्षा या गाड्यांचा टिकाऊपणा हा दुपटीने जास्त असल्याचा कंपनीचा दावा.

6 गाडी आपण कोणालाही विकली तरीही याच्यावर असलेल्या वॉरंटीचा फायदा समोरच्या ओनरला सुद्धा घेता येणार आहे.

7 दोन्ही गाड्यांमध्ये 34 लिटरची स्टोरेज क्षमता असेल.

Ola S1X and Ola S1X plus

8 बॅटरी IP67 रेटिंगची असल्यामुळे ह्या गाड्या वॉटरप्रूफ आहेत यामुळे पाण्यामध्ये बिनधास्तपणे ही गाडी चालवता येणार आहे.

9 सहा वेगवेगळ्या कलर मध्ये ह्या स्कूटर उपलब्ध असणार आहे..

या सर्व सुविधांमुळे ग्राहकांचा कल या गाड्यांच्या ( Ola S1X and Ola S1X plus ) खरेदीकडे असण्याची दाट शक्यता आहे. शेवटी असेच म्हणता येईल की इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्यांच्या स्पर्धेमुळे ग्राहकांचाच फायदा होईल यात शंका नाही.

Ola ची अधिकृत वेबसाइट – https://www.olaelectric.com/s1-x

Leave a comment

केस गळती रोखण्यासाठी 5 महत्त्वाची खनिजे.. स्टॉक मार्केटवर आधारित आठ सर्वकालीन प्रसिद्ध पुस्तके..