प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा ( Raj Kundra )अलीकडेच अश्लील चित्रपटांच्या निर्मितीच्या आरोपाखाली अटक झाल्यामुळे चर्चेत आला होता.अटकेतून सुटल्यानंतर त्याने काही दिवस मास्क घालायला सुरुवात केली होती त्यामुळे देखील तो चर्चेत होता, नंतर त्याने स्पष्ट केले की अटकेनंतरचे दिवस फार वेदनादायक होते आणि या वेदनेमुळेच मी मास्क घालायचो.
या वादामध्येच आणखी एक भर म्हणून कुंद्रा सध्या मनी लाँड्रिंग आणि बिटकॉइन पॉन्झी योजनेत सहभागी असल्याच्या संशयाने त्याला अंमलबजावणी संचालनालयाच्या ( ED ) चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. या कारवाई अंतर्गत ( Raj Kundra bitcoin scam ) ईडीने त्याच्या पुण्यातील एका बंगल्यासह 97 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. कुंद्राला युक्रेनमध्ये बिटकॉइन मायनिंग फार्म उभारण्यासाठी मदत केल्याच्या बदल्यात घोटाळ्याचा सूत्रधार अमित भारद्वाजकडून 285 बिटकॉइन्स मिळाल्याचा आरोप आहे. ईडीचा दावा आहे की कुंद्राकडे अजूनही ही बिटकॉइन्स आहेत, ज्यांची किंमत आता ₹150 कोटींहून अधिक आहे.
अशा प्रकारच्या अनेक वादाच्या भोवऱ्यात असल्यामुळे, कुंद्रा आणि त्याची पत्नी, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, यांच्या अमाप संपत्ती आणि आलिशान जीवनशैली बाबत चर्चा होताना दिसत आहे. चला तर मग जाणून घेऊया या दोघांची संपत्ती नेमकी आहे तरी किती?
नेट वर्थ आणि बिझिनेस. ( Raj Kundra net worth )
2021 मध्ये कुंद्राची अंदाजे एकूण संपत्ती $400 दशलक्ष, म्हणजेच जवळपास 2800 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जात होते. जागतिक स्तरावर सर्वात श्रीमंत ब्रिटिश आशियाई उद्योगपतींपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. याव्यतिरिक्त, कुंद्रा दांपत्य आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सचे मालक देखील होते परंतु 2015 मध्ये सट्टेबाजीच्या आरोपाखाली त्यांना बॅन करण्यात आले होते. सध्या त्यांनी अभिनेता अक्षय कुमारसोबत डीटीएच चॅनेलमध्ये गुंतवणूक केली आहे.
लक्झरी लाईफस्टाइल
कुणालाही हेवा वाटावा अशी या जोडप्याची लक्झरी लाईफस्टाईल आहे. राज कुंद्राने लग्नामध्ये शिल्पा शेट्टीला दिलेल्या अंगठीची फार चर्चा त्यावेळी झाली होती. ही अंगठी 20-कॅरेटची असून त्याची किंमत 3 कोटी रुपये होती.
सोबतच त्यांच्याकडे लंडनमध्ये 7-बेडरूमचे भव्य अपार्टमेंट आणि मुंबईत समुद्रकिनारी बंगला असून त्याची किंमत 24 कोटी रुपये आहे याव्यतिरिक्त मुंबई मधील जुहू येथे फ्लॅटसुद्धा आहे. कुंद्राने त्याच्या पत्नीला भेट म्हणून दिलेला बुर्ज खलिफा येथे ५० कोटींचा एक अपार्टमेंट देखील आहे. शिवाय, त्यांच्याकडे नोएडामध्ये 4 कोटी रुपयांची आणखी एक मालमत्ता आहे.
लक्झरी कार
त्यांच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज, लॅम्बोर्गिनी आणि BMW Z4 सारख्या अनेक कार आहेत, ज्यांची एकूण किंमत 10 कोटींहून अधिक आहे.
त्यांच्या कायदेशीर समस्या असूनही, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी विविध बिझनेसद्वारे लक्षणीय संपत्ती कमावली आहे. तथापि, अलीकडील वादांमुळे त्यांच्या ग्लॅमरस जीवनशैलीवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही परंतु वाद आणि कुंद्रा दाम्पत्य ह्या दोघांचा संबंध खूप मजबूत आहे हे विशेष.