जाणून घ्या मायकल जॅक्सन (Michael Jackson) बद्दल ह्या सात interesting गोष्टी..

आज प्रत्येकजण फेमस होण्यासाठी विविध माध्यम वापरतात त्यासाठी आपल्या आवडत्या सेलिब्रिटीची कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतात पण एखादा असा सेलिब्रिटी ज्याची कॉपी सर्व जग करण्याचा प्रयत्न करतो ज्याचे नाव आहे आपला लाडका मायकल जॅक्सन (Michael Jackson). जाणून घेऊया त्याच्याबद्दलच्या ह्या सात गोष्टी ज्यामुळे तुम्हालापण आश्चर्य वाटेल..

 

1 अँटी-ग्रॅव्हिटी लीनचा (anti gravity lean) शोध.

Michael Jackson

“स्मूथ क्रिमिनल” च्या म्युझिक व्हिडिओमध्ये जॅक्सनचे गुरुत्वाकर्षणाला challenge करणारे बूटा चे पेटंट घेतले, ज्यामुळे त्याला डान्स करताना समोर 45 अंशाच्या कोनात उभे राहता येत असे, ज्यामुळे त्याचा हा स्टंट सगळ्या जगात प्रसिद्ध झाला, नंतर जो तो ही step ट्राय करू लागला. सुरुवातीला ही अशक्य वाटणारी स्टेप बघून सर्वजण अचंभित झाले नंतर यामागचे सत्य उघडकीस आले, पण खरंच त्याच्या या नावीन्यपूर्ण कृतीचे लोकांनी खूप कौतुक केले.

2 मूनवॉकचा शोध :

मायकल जॅक्सनने 1983 मध्ये टीव्ही स्पेशल “मोटाउन 25: येस्टर्डे, टुडे, फॉरएव्हर” वरील “बिली जीन” च्या प्रदर्शनादरम्यान “मूनवॉक” या डान्स स्टेप ला लोकप्रिय केले. आज मूनवॉक म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे फक्त मायकल जॅक्सनच. आजही ही स्टेप बऱ्याच फिल्म मध्ये सर्रास वापरली जाते आणि ही स्टेप जो-तो ट्राय करून impression टाकायचा प्रयत्न करतो..

3 नेव्हरलँड रॅंच (Neverland Ranch) या घरावर उधळपट्टी:

Michael Jackson

जॅक्सनचे पूर्वीचे घर, नेव्हरलँड रॅंच (Neverland Ranch) ही एक विस्तीर्ण जागेत पसरलेलं त्याच घर होतं, ज्यामध्ये मनोरंजन पार्क, प्राणीसंग्रहालय आणि चित्रपटगृह होते. त्यात एक लहान रेल्वे ट्रॅक आणि फुलांचे घड्याळ देखील होते, शेकडो दशलक्ष डॉलर्सचे हे घर, पण त्या घराच्या देखभालीशी संबंधित आर्थिक बोझामुळे जॅक्सन (Michael Jackson) च्या आर्थिक स्थितीवर खूप परिणाम झाला व यामुळे त्याच्यावर दिवाळखोर होण्याची वेळ आली. अशा प्रकारे त्याची विलक्षण व महागडी जीवनशैली दिसून येते.

अब्जावधी डॉलरचा करिअर:

मायकेल जॅक्सनला इतिहासातील सर्वाधिक कमाई करणार्‍या सेलब्रिटींपैकी एक म्हणून ओळखले जाते, ज्याने विक्रमी अल्बम विक्री, कॉन्सर्ट टूर आणि व्यावसायिक भागीदारीद्वारे अब्जावधींची संपत्ती जमा केली आणि ती दोन्ही हातांनी खर्च पण केली. त्यावेळचा तो मोस्ट डिमांडडेड सेलिब्रिटी होता आणि नेहमी आपल्या चार्टर्ड विमानाने तो देश – विदेशाचे टूर करत असे.

त्वचारोग आणि प्लास्टिक सर्जरी:

Michael Jackson

मायकल जॅक्सनने ऑपरा विन्फ्रेच्या शो मध्ये त्याच्या बदलत्या त्वचेच्या रंगाचे कारण vitiligo (कोड) आहे असे सांगितले होते. म्हणून त्याने प्लास्टिक सर्जरी केली असे म्हणतात. परंतु त्याच्या आयुष्यातील या पैलूभोवती मीडियाचे अनुमान आणि विवाद त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत चर्चेचा विषय राहिला, पण हे नक्की की लोक त्याचे हे वेगळेच रूप बघून अचंभित झाले होते.

एलिफंट मॅन (Elephant man) चे अवशेष खरेदी:

जॅक्सनने 1987 मध्ये एलिफंट मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोसेफ मेरिकचे अवशेष विकत घेण्यासाठी बोली लावली. त्याने मेरिकच्या दुर्मिळ रोग असलेल्या अवस्थेमुळे झालेल्या संघर्षा बद्दल खूप सहानुभूती असल्याने त्याला त्याचे अवशेष सन्मानपूर्वक दफन करायचे होते. यावरून त्याच्या स्वभावाचा वेगळाच पैलू लोकांसमोर आला ज्याची लोकांनी खूप स्तुती केली.

Leave a comment

केस गळती रोखण्यासाठी 5 महत्त्वाची खनिजे.. स्टॉक मार्केटवर आधारित आठ सर्वकालीन प्रसिद्ध पुस्तके..