शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार (GR), शिक्षकांना, त्यांनी काय परिधान केले आहे याबद्दल सावध राहण्यास सांगितले आहे ( Teacher dress code ). कारण शाळेत जाणाऱ्या मुलांवर सर्वात जास्त प्रभाव असतो तो शिक्षकांचा आणि शिक्षकांनी जर अयोग्य कपडे परिधान केल्यास विद्यार्थ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. असे अधिसूचनेत म्हटले आहे.
प्रथमच, महाराष्ट्र सरकारने शाळेतील शिक्षकांसाठी ड्रेस कोड ( Teacher dress code ) जारी केला आहे. यानुसार शिक्षकांना आता जीन्स, टी-शर्ट, गडद रंगाचे कपडे, डिझाइन किंवा प्रिंट असलेले कपडे घालण्याची परवानगी राहणार नाही. त्यात महिला शिक्षकांनी सलवार किंवा चुरीदार घालावे. कुर्ता आणि दुपट्टा किंवा साडी परिधान केली तरीही चालेल आणि पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राउझर्स घालावे ( इन करून ) असे असे आदेशात म्हटले आहे.
या GR नुसार शासनाने शाळेच्या शिक्षकांसाठी ड्रेस-कोडबाबत ( Teacher dress code ) नऊ-सूत्री मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहे. हा जीआर सर्व शाळांना लागू आहे, मग ते सार्वजनिक असो की खाजगी चालवल्या जाणाऱ्या शाळा. शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व शाळांना हा जीआर लागू असेल.
या आदेशाला प्रतिक्रिया म्हणून सर्व स्तरावरून शासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांनी शासनाच्या या निर्णयावर टीका केली आहे. मुंबईतील एका शाळेतील शिक्षक म्हणाले, “शिक्षक आधीच कोणता पोशाख घालावा याबद्दल जागरूक आहेत. शाळा देखील याबाबत आपल्या परीने याची खात्री करून घेतात. राज्याने याबाबत हस्तक्षेप करण्याची आणि शिक्षकांसाठी ड्रेस-कोड बाबत सूचना करण्याची अजिबात गरज नव्हती.
“शाळा आणि शिक्षकांच्या मते, शिक्षकांनी काय परिधान करावे हे त्यांचा वैयक्तिक आणि स्थानिक स्तरावरील प्रश्न आहे.
शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मात्र सांगितले की, ” ही फक्त मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि याला आदेश म्हणून विचारात घेऊ नये. या अधीसुचनेचे पालन न केल्यास कोणतीही कारवाई करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.”
* आता नावाअगोदर Tr. लागेल.
जसे डॉक्टरांसाठी “Dr.”, वकिलांसाठी “Adv.” असा उपसर्ग असतो त्याप्रमाणे शिक्षक आता त्यांच्या नावाअगोदर “Tr” हा उपसर्ग म्हणून वापर करू शकणार आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांची ओळख म्हणून व त्यांचे मनोबल वाढवण्याच्या उद्देशाने हा आदेश जारी केला आहे.
शालेय शिक्षण आयुक्तालयाला याबाबत पुरेशी प्रसिद्धी देण्याबरोबरच चिन्ह निश्चित करण्यासंबंधी कामाला लावले आहे.
GR खालील लिंक द्वारे डाउनलोड करता येईल.