Toyota taiser | आता विसरा बलेनो आणि फ्राँक्स, टोयोटाने लाँच केली जबरदस्त कार जे देईल सुरक्षेसोबतच चांगला मायलेज.

              मार्केटमध्ये एकसे बढकर एक कार उपलब्ध आहेत परंतु त्यापैकी काही मोजक्याच कार नावाजले-ल्या आहेत ज्यामध्ये त्याचा लूक, कारचा परफॉर्मन्स, ॲवरेज या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अशाच प्रका-रच्या कार मध्ये प्रसिद्ध आहेत मारुतीची बलेनो आणि फ्राँक्स, परंतु ग्लोबल एनकॅप रेटिंग नुसार या कारला खूप कमी रेटिंग प्राप्त झाल्यामुळे ही कार सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न निर्माण करते म्हणून या कारला टक्कर देण्यासाठी टोयोटाने अर्बन क्रूजर टेजर ( Toyota taiser ) नावाचे एक  नवीन मॉडेल बाजारात लॉन्च केले आहे जी सेफ्टी तर देतेच परंतु लूक, ऍव्हरेज, या सर्व बाबतीत बाकी गाड्यांपेक्षा वरचढ आहे. ग्लोबल सेफ्टी रेटिंग मानकानुसार या कारची सेफ्टी रेटिंग 4 स्टार आहे.

Toyota taiser

  • कारमधील विशेष फीचर..

     ही कार  22.8 किमी/ लिटर चा मायलेज ( Toyota taiser mileage) देईल असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे, सोयीचे क्रूज कंट्रोल, वायरलेस चार्जिंग, 360° कॅमेरा, स्मार्ट वॉच कनेक्टिव्हिटी,60:40 स्प्लिट रिअर सीट, 6 एअरबॅग, स्टेबिलिटी कंट्रोल, पार्किंग सेन्सर, 308 लिटर बुटस्पेस, रिअर एसी वेंट, हेडअप डिस्प्ले, 1197 सीसी इंजिन आणि इतर अनेक वैशिष्ट्ये या कारमध्ये उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ही कार एकूण 8 कलर मध्ये उपलब्ध असून त्यामध्ये तीन ड्युअलटोन कलर देखील बघायला मिळते.

Toyota taiser

      या कारच्या इंटेरियर मध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरलेली असून सर्व लेटेस्ट फीचर उपलब्ध करून देण्याचा टोयोटाने पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. ही कार वेगवेगळ्या वेरियंटमध्ये उपलब्ध असून ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे त्यानु-सार त्याची किंमत देखील बघायला मिळते. तरीदेखील या कारची किंमत ( Toyota taiser price ) 7.8 लाखांपासून ते 12 लाखापर्यंत असून या बजेटमध्ये एक चांगला पर्याय आहे असे म्हणायला हरकत नाही.

                टोयोटा हा ब्रांड मजबुती व टिकाऊपणा-साठी ओळखला जात असल्याने ही कार नक्कीच मारुतीच्या गाड्यांना या सेगमेंटमध्ये टक्कर देण्यास सज्ज आहे.

    टोयोटाच्या या कारबद्दल अधिक माहिती त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळवता येईल.

https://www.toyotabharat.com/showroom/urbancruiser-taisor/#d27-comfort

Leave a comment

केस गळती रोखण्यासाठी 5 महत्त्वाची खनिजे.. स्टॉक मार्केटवर आधारित आठ सर्वकालीन प्रसिद्ध पुस्तके..