TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर वर सध्या बंपर ऑफर सुरू आहे, TVS कंपनी आपल्या iQube इलेक्ट्रिक स्कूटर वर सध्या 41000 Rs. पर्यंतचे फायदे ग्राहकांना देत आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत हे फायदे ग्राहकांना घेता येणार आहे. ही स्कूटर 3.04 kWh बॅटरी पॅकसह उपलब्ध होणार असून ही स्कूटर एका चार्जमध्ये प्रत्यक्षात 100 किमी ( अधिकृत रेंज 145 km) च्या वर प्रवास करू शकते असा कंपनीचा दावा आहे. TVS मोटर कंपनी आपल्या iQube इलेक्ट्रिक स्कूटरवर मोठी ऑफर आणि सबसिडी देत आहे, ज्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. ही ऑफर निवडक शहरे आणि शोरूम मध्ये या महिन्याच्या शेवटपर्यंत उपलब्ध असेल, शक्यतो सध्या उपलब्ध असलेला साठा विकण्यासाठी आणि इतर इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करण्यासाठी ही सवलत दिली जात आहे.
या महिन्यात TVS iQube जर खरेदी करत असाल तर 6,000 रू चा कॅशबॅक ऑफरचा लाभ घेऊ शकता अट फक्त एवढीच की ही स्कूटर नो कॉस्ट EMI द्वारे खरेदी करावी लागेल. याशिवाय 7500 रु. चे अतिरिक्त फायदे मिळणार आहेत. TVS iQube स्कूटरवर एक्स्ट्रा वॉरंटी घेण्यासाठी रु. 5,999 लागतात परंतु या महिन्याअखेर खरेदीदारांना ही वॉरंटी फक्त 1000 रुपया मध्ये मिळेल परिणामी ४,९९९ रू चा फायदा होईल. ही ऑफर इथेच संपत नाही तर TVS iQube ची खरेदी केल्यास शासनातर्फे मिळणाऱ्या FAME II सबसिडी अंतर्गत चक्क 22,065 रू कमी होणार आहेत. यामुळे ग्राहकांना 40,564 रूपया चा एकूण लाभ मिळणार आहे.
FAME II सबसिडी योजना या महिन्याच्या शेवटी संपणार असून सरकार ती वाढवणार की नाही हे अजून निश्चित नाही. TVS iQube ने भारतीय बाजारात लक्षणीय यश मिळवले आहे, या स्कूटरची गेल्या वर्षी एकूण विक्री 187,181 युनिट्सपर्यंत पोहोचली होती, जी त्या मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय 216% ची वाढ आहे. जी की 2022 मध्ये 59165 युनिट्स होती. या स्कूटरने मागच्या वर्षी प्रत्येक महिन्यात सरासरी 15598 युनिट्स ची विक्री केली होती ज्यामध्ये ऑगस्ट महिन्यात तब्बल 23,887 युनिट्सचा मासिक विक्रीचा सर्वोच्च आकडा गाठला. TVS ने 2023 च्या उत्तरार्धात भारतात तब्बल दोन लाख स्कूटर विक्रीचा टप्पा ओलांडला आहे.
Specification | TVS iQube S | TVS iQube ST |
Top speed | 78 km/h | 82 km/h |
Range | 100 km | 145 km |
Weight | 117.2 | 128.8 kg |
Ground clearance | 157 mm | 157 mm |
Battery | 3.04 kWh | 4.56 kWh |
Water resistance | IP67 | IP67 |
Rated Voltage | 52 V | 52 V |
Charging time | 4h 30min (650 W) | 4h 06min (950 W) |
Storage | 32 litres | 32 litres |
TVS iQube दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये बेस व्हेरियंटची किंमत रु. 1,55,600 आणि S मॉडेल ची किंमत 1,62,300 (एक्स-शोरूम) असणार आहे. 25 मार्च 2024 पर्यंत TVS iQube खरेदी करणारे आणि नोंदणी करणारे ग्राहक FAME II अनुदानासाठी पात्र असतील ज्यामध्ये याची किंमत अजून कमी होईल.