बॉलिवुड म्हटलं की दोन गोष्टी येतात, एक तर प्रसिद्धी आणि दुसरा पैसा,आपल्या दमदार कर्तुत्वाने बऱ्याच अभिनेत्यांना प्रसिद्धी तर मिळालीच पण सोबतच अफाट संपत्तीपण. जगातील सर्वात श्रीमंत 10 सेलिब्रिटिंची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे ज्यात भारतातील फक्त एकाच अभिनेत्याने स्थान पटकावले आहे आणि तो म्हणजे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान.
दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला आणि वाढलेला शाहरुख, याला बॉलीवूडचा बादशाह कुणी उगाच म्हणत नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या एका सांख्यिकी सर्वेनुसर 2023 अखेर, त्याची एकूण संपत्ती (Wealth of Shahrukh) $750 दशलक्ष (₹6300 कोटी) इतकी आहे, ज्यामुळे तो टॉम क्रूझ, जॉर्ज क्लूनी आणि रॉबर्ट डी नीरो यांसारख्या हॉलीवूड कलाकारांना मागे टाकून जागतिक स्तरावर दुसरा सर्वात श्रीमंत अभिनेता बनला आहे.
2023 मध्ये ब्लॉकबस्टर कमाई..
2023 हे वर्ष SRK साठी गेम चेंजर ठरले आहे. त्याच्या “पठाण” या चित्रपटाने जगभरात ₹1,050 कोटींपेक्षा जास्त कमाई करत बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड मोडीत काढले. यामध्ये चित्रपटाच्या 60% नफ्याचा तो वाटेकरी आहे असे म्हटले जात आहे, जे की अंदाजे ₹200 कोटी होतात. या यशानंतर “जवान” ने देखिल जागतिक स्तरावर जवळपास ₹1,100 कोटी कमावले, त्यामध्ये शाहरुखचे मानधन ₹100 कोटी होते आणि यामध्ये नफ्यातील वाटा हा तर वेगळाच.
शाहरुख खानची प्रचंड मालमत्ता (Wealth of Shahrukh)..
भव्य जीवनशैलीसाठी ओळखला जाणारा शाहरुखकडे मुंबईतील प्रतिष्ठित मन्नत (Mannat) बंगला आहे, जी 2001 मध्ये ₹13.32 कोटींना त्याने खरेदी केली आणि आता त्याची किंमत ₹200 कोटी आहे असे सांगितले जाते. द एलिट पार्क लेनवरील त्याच्या लंडन व्हिलाची किंमत ₹180 कोटी आहे आणि दुबईच्या पाम जुमेराहमध्ये त्याच्याकडे ₹100 कोटी किमतीचा व्हिला आहे त्याचे नाव देखील ‘जन्नत’ आहे.
व्यवसायीक भागीदारी आणि गुंतवणूक..
शाहरुखचे व्यावसायिक कौशल्य त्याच्या VFX आणि प्रॉडक्शन्स कंपनी, रेड चिलीज एंटरटेनमेंट द्वारे समजते, ज्याची वार्षिक उलाढाल ₹500 कोटी आहे. तसेच कोलकाता नाइट रायडर्समध्ये त्याच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट चा 55% वाटा आहे ज्याची किंमत ₹780 कोटी आणि त्रिनबागो नाइट रायडर्स, अबू धाबी नाइट रायडर्स आणि लॉस एंजेलिस नाइट रायडर्समधील त्याच्या भागाची किंमत अंदाजे ₹740 कोटी आहे.
दिल्लीतील साधारण पार्श्वभूमीपासून ते बॉलीवूड आणि व्यवसायाच्या चकाकत्या उंचीपर्यंत, शाहरुख खानचा प्रवास त्याच्या प्रतिभा आणि उद्योजकतेचा पुरावा आहे. त्याची संपत्ती निव्वळ वाढतच चालली आहे, किंग खानचा वारसा मनोरंजनाच्या जगात आणि त्याही पलीकडे खरोखरच उल्लेखनीय आहे.