गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे बघितले जाते याला कारणही तसेच आहे. सध्या चलनातील पैसे हे पेपर करन्सी असल्यामुळे त्याचा पुरवठा कमी जास्त करण्याचा अधिकार रिझर्व बँकेकडे असल्याने पैशाची किंमत स्थिर राहत नाही परंतु सोन्याचा पुरवठा मर्यादित असल्याने सोने हे सर्व जगामध्ये सर्वात भरवशाचं चलन म्हणून प्रसिद्ध आहे.
* का वाढत आहे सोन्याचा भाव? ( Why gold rate is increasing )
आज सोन्याने प्रति तोळे 71 हजाराची तर चांदीने 82,000 प्रति किलो ची पातळी ओलांडली आहे. जगभरातील बँकांकडून सोन्याची खरेदी केली जात आहे, त्यामध्ये त्या त्या देशाच्या मध्यवर्ती बँकांचा समावेश तर आहेच परंतु मोठे इन्वेस्टमेंट फर्म, व्यापारी, पेन्शन फंड इत्यादीद्वारे मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जात आहे. आता चीनमध्येच बघा, तेथील इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये रिटर्न कमी होण्याची शक्यता व चलनाची किंमत कमी होईल या भीतीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत आणि अजून भाव वाढेल या आशेने आणि आपण गुंतवणुकीमध्ये मागे राहू या भीतीने सोने खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे आणि तसेही भारतामध्ये लग्नाचा सीजन सुरू झाल्याने सोन्याची दुकाने गजबजलेली दिसून येते ज्यामध्ये जरी सोने कमी प्रमाणात खरेदी केले जात असेल पण तरीही एकूण पैशांची उलाढाल मात्र तेवढीच मोठीच दिसून येते.
जेव्हा कधी जगभरात अस्थिरता असते त्या त्या वेळेस सोन्याचा भाव ( gold rate ) वाढताना दिसून येते सध्या जगभरात ताणतणावाचे वातावरण असल्याने व अनेक देशात आणि भारतात सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळे राजकीय अस्थिरता, डॉलरच्या तुलनेत घसरणारा भारतीय रुपया यामुळे सोने आयात करणे महाग होत आहे याचा प्रभाव देखील सोन्याच्या भावावर पडत आहे.
* सोनं कशाप्रकारे खरेदी करावं?
जगभरात सोने खरेदी करण्याचा सर्वात आवडता पर्याय म्हणजे गोल्ड ईटीएफ ( gold ETF ) परंतु गुंतवणूकदार ईटीएफ मधून पैसा काढून घेत असल्याचे दिसून येत आहे यामध्ये कदाचित नफा वसुली केली जात असावी असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. येत्या काळात देखील सोन्यामध्ये तेजी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण अमेरिकन अर्थव्यवस्थेत घसरण होण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांचा सोने खरेदी कडे कल दिसून येत आहे.
* भविष्यात सोन्याचे भाव वाढेल का?
जगातील प्रसिद्ध वित्तीय सेवा देणारी जे पी मॉर्गन व इतर अनेक कंपन्यांच्या मते सोन्याचा भाव 2025 पर्यंत वाढतच राहण्याचा अंदाज आहे. सोने खरेदी करायचे असल्यास भारतामध्ये सॉवरीन गोल्ड बाँड ( Sovereign gold bond ) हा सर्वात उत्कृष्ट पर्याय उपलब्ध आहे ज्यामध्ये सध्याच्या भावापेक्षा काही डिस्काउंट मध्ये सोने खरेदी करण्याची संधी आपल्याला मिळते. यात वार्षिक अडीच टक्के व्याज देखील मिळत असल्याने समोर सोन्याचा भाव जरी स्थिर राहिला तरी बचत खात्यावरील व्याजाएवढा परतावा ही गुंतवणूक देत राहील यात काही शंका नाही.
खालील लिंकद्वारे जाणून घ्या सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा उत्कृष्ट मार्ग.