8 best books on share market | शेअर मार्केट मध्ये एक्स्पर्ट व्हायचंय, मग हे पुस्तक नक्की वाचाच..

शेअर बाजारात invest करणे हे आजचे एक ट्रेण्ड बनलेले आहे. जिथे बघावं तिथे याबद्दल चर्चा दिसून येते आता तर YouTube वर कशी ट्रेडिंग (trading) करावी, कोणत्या शेअर मध्ये पैसे invest करावे जेणेकरून त्यात पटीने ( Multibagger ) वाढ होईल याबद्दल महागड्या कोर्सेस ची जाहिरात दिसते पण या कोर्सेसने लोकांचा फायदा होतोच असे नाही तर यामुळे बऱ्याच लोकांचे नुकसान देखील झाले आहे. पण मित्रहो मार्केटमध्ये गुंतवणूक करणे तेवढेही अवघड नाही जेवढे आपल्याला वाटते, गुंतवणूक करणे हे सातत्य आणि धैर्याचे काम आहे आणि ही प्रक्रिया कुणीही शिकू शकतो आणि या विषयावर अनेक पुस्तके देखील लिहिली गेली आहेत.

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यावरील आठ सर्वकालीन प्रसिद्ध पुस्तकांची (8 best books on share market) यादी इथे सादर करीत आहे ज्याद्वारे आपण अतिशय सोप्या पद्धतीने एक चांगला गुंतवणूकदार (Investors) होऊ शकाल.

1 “द इंटेलिजेंट इन्व्हेस्टर” ( The Intelligent Investor) – बेंजामिन ग्रॅहम

 

बहुधा value Investing चे बायबल म्हणून या पुस्तकाला संबोधले जाते, हे पुस्तक अतिशय प्रसिद्ध यामुळेदेखील आहे कारण प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे (Warren Buffet) हे बेंजामिन ग्रॅहॅम यांना आपले गुरू मानतात आणि त्यांनी देखील हे पुस्तक वाचूनच गुंतवणुकीला सुरुवात केली आणि आज जगात सर्वात श्रीमंत आणि यशस्वी investor म्हणून नावाजलेले आहेत

2 “अ रँडम वॉक डाउन वॉल स्ट्रीट” -बर्टन मल्कील (Burton Malkiel )

         

 मल्कील हे बाजारात गुंतवणूक करण्यासाठी विविध पद्धतींचा उलगडा आपल्या पुस्तकात करतात,
कमी वेळ देऊन कशाप्रकारे एखाद्या शेअर चा प्रभावीपणे अभ्यास करायचा आणि गुंतवणुकीसंबंधी निर्णय कसा घ्यायचा हे या पुस्तकात सांगितले आहे.

3 “कॉमन स्टॉक्स अँड अनकॉमन प्रॉफिट्स” -फिलिप फिशर

दीर्घ कालावधीसाठी शेअर चा अभ्यास कसा करावा व एखादी चांगला ग्रोथ स्टॉक कसा निवडावा यासंबंधी सविस्तर माहिती यात सांगितली आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी दर्जेदार कंपन्यांची ओळख करणे हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे.

4 “वन अप ऑन वॉल स्ट्रीट” – पीटर लिंच

      लिंच हे एक दिग्गज फंड मॅनेजर आणि दूरदृष्टी असलेले Investor देखील आहेत आणि गुंतवणुकीसाठी अतिशय सोपी पद्धत कशी वापरावी जेणेकरून एक सामान्य गुंतवणूकदार (Investor) देखील चांगला परतावा मिळवू शकेल याबद्दल या पुस्तकात सविस्तर सांगितले आहे.

5 ” सेक्युरिटी अनालिसिस” – बेंजामिन ग्रॅहम आणि डेव्हिड डॉड.


ग्रॅहमचे आणखी एक उत्कृष्ट पुस्तक ज्यामधे डॉड यांनी देखील सह-लेखन केलेले आहे, यामध्ये सुरक्षा विश्लेषण आणि Value Investing अशा महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश व मार्गदर्शक या पुस्तकात केलेले आहे.

6 “द लिटल बुक दॅट स्टिल बीट्स द मार्केट” -जोएल ग्रीनब्लाट

यामध्ये ग्रीनब्लाट स्टॉक investing साठी मॅजिक फॉर्म्युला स्पष्ट करतात, संभाव्य फायदेशीर स्टॉक्स ओळखण्यासाठी value आणि quality या घटकाची एकत्रितपणे चर्चा या पुस्तकात करतात.

7 “रेमिनीसेन्सेस ऑफ अ स्टॉक ऑपरेटर” – एडविन लेफेव्र

ही एक जेसी लिव्हरमोर यांचे काल्पनिक चरित्र आहे, जे सर्वकालीन महान स्टॉक ट्रेडर्सपैकी एक आहे,जे ट्रेडिंग सायकॉलॉजी आणि मार्केट डायनॅमिक्सचे धडे या पुस्तकात देतात देतात.

8 “मार्केट विझार्ड्स” – जॅक डी. श्‍वेगरचे.

पुस्तकांच्या या मालिकेत लेखक यशस्वी ट्रेडर च्या मुलाखती घेतात, व त्यांच्या वेगवेगळ्या strategies आणि त्यासाठीची एक यशस्वी रणनीती कशी वापरावी, ट्रेडिंग आणि इनवेस्टिंग (Investing) याबाबत वेगवेगळे दृष्टीकोन व माहिती या पुस्तकात आहे.

वरील पुस्तकांमध्ये गुंतवणुक (Investing) तसेच ट्रेडिंग संबंधी अनेक महत्त्वपूर्ण बाबी आणि रणनीती समाविष्ट आहे, शेअर बाजारातील उलाढाल याबाबत सविस्तर माहितीद्वारे तुम्ही नक्कीच एक यशस्वी गुंतवणूकदार होऊ शकाल.

Leave a comment

Exit mobile version