Covered call strategy | मार्केट मधून नियमित उत्पन्न मिळवण्याचा एक जबरदस्त मार्ग..

फायनान्सच्या गतिमान जगात, गुंतवणूकदार पैसे कमावण्याचे सतत नवनविन मार्ग शोधत असतात ज्यामध्ये जोखीम आणि उत्पन्न यांचे  संतुलन राखून कसे नियमित उत्पन्न मिळवता येईल याचा प्रयत्न करतात. अशीच एक स्ट्रॅटेजी ( पद्धत ) जी नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी लोकप्रिय आहे ती म्हणजे कवर्ड कॉल स्ट्रॅटेजी (Covered call strategy), तर ही कवर्ड कॉल स्ट्रॅटेजी काय असते ? (what is covered call strategy), तर यामध्ये एखादा शेअर घेणे (delivery) आणि त्याच शेअर मध्ये ऑप्शन्स ट्रेडिंग करणे यांचा समावेश आहे, आता तुम्ही म्हणाल की, ऑप्शन्स ट्रेडिंग ? यात तर खूप रिस्क आहे. तर तसे नाही, हीच तर कमाल आहे या स्ट्रॅटेजी ची.  या स्ट्रॅटेजी मुळे तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओचा  परतावा वाढवण्याचा एक अनोखा मार्ग मिळतो.

या लेखात, आपण कवर्ड कॉल स्ट्रॅटेजी (Covered call strategy) या स्ट्रॅटेजीच्या गुंतागुंतींचा सखोल अभ्यास करू, ते कसे करायचे, याचे फायदे आणि संभाव्य धोके काय असू शकतात हे पाहूया. यामधे फक्त एकच अट आहे ते म्हणजे तुमचे कॅपिटल.. जे की थोडे जास्त लागेल, म्हणजेच जवळपास 5 ते 9 लाख च्या दरम्यान आणि यामध्ये तुम्ही महिन्याला 1 ते 2 % पर्यंतचा परतावा मिळवू शकता, ते पण लाँगटर्म गुंतवणूक करून. यामध्ये सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे तुम्हाला ससत वेळ देण्याची वा स्क्रीनसमोर बसून राहण्याची देखील गरज नाही..

* कवर्ड कॉल स्ट्रॅटेजी (Covered call strategy)

ही एक लोकप्रिय ऑप्शन्स ट्रेडिंग पध्दत आहे जिथे गुंतवणूकदार शेअरमध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करतो आणि त्याच शेअरचा  (स्टॉकचा) कॉल ऑप्शन्स विकतो. थोडक्यात, यात कॉल सेलिंग या पर्यायाद्वारे उत्पन्न आणि सोबतच स्टॉक मालकी ही वैशिष्ट्ये एकत्र येतात. हे कसे कार्य करते ते पाहू:

* स्टॉक मालकी..

यामध्ये गुंतवणूकदार एखाद्या विशिष्ट कंपनीचे शेअर्स खरेदी करून सुरुवात करतो. त्यामुळे त्यांना शेअर्सच्या किमतीमधील वाढीचा लाभ घेण्याची त्याला संधी मिळते.

जसे उदाहरण (covered call strategy example)

समजा HDFC bank याचा बाजारातील सध्याचा भाव आहे 1650 आणि तुम्ही याचा 1 लॉट (550 शेअर्स) घेतला जे होतात

550 × 1650 = 907500 रुपये

याचाच अर्थ HDFC Bank च्या शेअर मध्ये ही स्ट्रॅटेजी वापरायची असल्यास तुमचे भांडवल जवळपास 9 लाख पाहिजे. पण लक्षात ठेवा ही रणनीती अशाच शेअर मध्ये वापरा ज्याचे फंडामेंटल चांगले असेल आणि तुमचा थोडा त्या शेयर बद्दलचा थोडा अभ्यास / विश्वास असेल.

 

* कॉल ऑप्शन विक्री

आता 1650 भाव असलेल्या Hdfc Bank चा चालू महिन्याच्या एक्सपायरी (expiry) मध्ये 1700 च्या ( स्ट्राईक प्राइज ) कॉल ऑप्शन चा प्रीमियम समजा 30 रुपये आहे आणि महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्ही 1700 चा कॉल ऑप्शन सेल केला तर आता इथे 2 फायदे आहेत, एक म्हणजे जर या शेअर चा भाव एक्सपायरी (expiry) च्या दिवशी जर 1700 च्या खाली राहिला तर 1700 चा  (स्ट्राईक प्राइज) प्रीमिअम 0 होऊन सर्व प्रीमियम तुम्हाला मिळेल कारण त्या शेअर कहा भाव 1700 (स्ट्राईक प्राइज) च्या वर गेलाच नाही यामुळे तो सर्व प्रीमिअम तुम्हाला मिळेल (30 रुपये), यामध्ये तुम्ही एक्सपायरी (expiry) च्या दिवशी  1700+30 = 1730 पर्यंत सेफ असाल कारण तो सर्व प्रीमियम सेल केल्याबरोबर तुम्हाला मिळेल आणि यामध्ये 1730 च्या वर तुम्हाला लॉस होणे चालू होईल म्हणजेच तुम्हाला त्या महिन्याच्या एक्सपायरी (expiry) ला

550 × 30 = 16500 प्रीमियम मिळेल.

म्हणजेच त्या महिण्यात तुमच्या शेअर्स ची किंमत 50 ने वाढून 1700 जरी झाले तरिदेखील (1650 ते 1700) तुम्हाला 16500 प्रीमियम मिळेल.

आता यामध्ये दोन बाबी होऊ शकतात.

पहिली बाजू.. (covered call strategy example)

जर हा शेअर 1730 च्याही वर गेला तर मला लॉस होणे चालू होईल, जर समजा हा शेअर 1800 रुपये गेला तर एक्सपायरी (expiry) च्या दिवशी तर मला खूप लॉस होईल.
तर बघा यावेळेस तुम्हाला झालेला लॉस..

1800 – 1730 (तूमची सेफ असलेली प्राइझ)
= 70

म्हणजेच

70 × 550 (1 लॉट ) = 38500 रुपये लॉस

तुम्हाला वाटेल हा लॉस तर खूप झाला, परंतु यासाठी तुम्ही डिलिव्हरी (delivery) मध्ये 1650 ला घेतलेला शेअर ची किंमत पण वाढली असेल ना, त्यामध्ये तुम्हाला..

1800 – 1650 = 150 (एका शेअरमागे) नफा

आणि तुमच्याकडे 550 शेअर्स आहेत ज्यामध्ये..

550 × 150 = 82500 नफा झालेला असेल,

म्हणजेच..

82500 (शेअर मध्ये मिळवलेला नफा) अधिक
16500 (प्राप्त प्रीमियम)
म्हणजेच एकूण तुमचा एकूण फायदा  99000 आणि तुम्हाला कॉल सेलिंग मध्ये झालेले नुकसान 38500 रुपये,
म्हणजे तुमचा झालेला एकूण फायदा..

99000 – 38500 = 60500 रुपये

दुसरी बाजू.. (covered call strategy example)

आता समजा या शेअरची किंमत 1650 वरून घसरून 1600 आली तर घाबरण्याचे काही कारण नाही, कारण या शेअर्सची डिलिव्हरी (delivery) आपण लॉन्गटर्म साठी घेतलेली आहे आणि आपण या शेअरला होल्ड करणार आहोत तर यामध्ये 1700 च्या स्ट्राइक चे प्रीमियम झीरो होईल म्हणजे तुम्हाला

30 × 550 = 16500 रुपये मिळेल आणि या शेअर ची ॲक्च्युअल खरेदी किंमत..

1650 – 30 = 1620 पडली असे समजता येईल आणि चालू एक्सपायरी झाल्यानंतर पुढच्या महिन्याच्या एक्सपायरी ला तुम्ही पुन्हा एकदा दूरचे कॉल सेल करू शकता जसे की

समजा, HDFC बँकेचा शेअर 1600 पर्यन्त आला आहे तर पुढच्या महिन्याची एक्सपायरी असलेले 1650 चा कॉल सेल करता येईल ज्याचा प्रीमियम 30 रूपयाच्या आसपास असेल ज्यामध्ये तुम्ही 1680 पर्यंत सेफ असाल (1650 स्ट्राइक + 30 प्रीमियम = 1680)

यामध्ये हा शेअर खूप पळाला तर कॉल मध्ये तुम्हाला जरी खूप नुकसान होईल पण त्यासाठी प्रॉफिट मध्ये असलेला शेअरचा लॉट तुम्ही बाजारभावात विकल्यावर शेवटी प्रॉफिट मध्येच राहाल. जर तुम्ही म्हणत असाल की लाँगटर्म साठी घेतलेला शेअर मला लवकरच विकावा लागेल तर या शेअर ला पुन्हा स्वस्त कसा घेता येईल याची पण खूप इंटरेस्टिंग रणनीती (strategy) पुढच्या लेखात आपण सविस्तर बघणार आहोत..

कॉल ऑप्शन्सच्या विक्रीच्या (Selling) बदल्यात, गुंतवणूकदाराला प्रीमियम प्राप्त होतो. हा प्रीमियम तात्काळ उत्पन्न मिळवून देतो. कव्हर कॉल स्ट्रॅटेजीचे ( covered call strategy ) सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे नियमित उत्पन्न निर्माण करण्याची क्षमता. कॉल ऑप्शन्सच्या विक्रीतून प्राप्त होणारे प्रीमियम प्रत्येक एक्सपायरीला गुंतवणूकदारांना पैशाचा रोख प्रवाह चालू ठेवतात, ज्यामुळे शेअर्सचा भावामधील वाढीच्या नफ्याव्यतिरिक्त नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी हा एक आकर्षक पर्याय बनतो.
कॉल ऑप्शन्स विक्रीद्वारे नियमित प्रीमियम्स प्राप्त करून, गुंतवणूकदार अप्रत्यक्षपणे स्टॉकची खरेदी किंमत नियमितपणे कमी करू शकतो. याद्वारे संभाव्य तोट्यापासून बचाव करू शकतो आणि एकूण पोर्टफोलिओचा परतावा वाढवू शकतो.

* मर्यादित वरची बाजू..

कव्हर्ड कॉल स्ट्रॅटेजी ( Covered call strategy ) बाजारातील अस्थिरतेपासून बचाव म्हणून काम करू शकते. हे जरी शेअरच्या वाढीच्या  वरच्या क्षमतेवर मर्यादा घालू शकते, परंतु कॉल ऑप्शन विक्रीतून निर्माण होणारे उत्पन्न बाजारातील मंदीच्या वेळी संभाव्य नुकसान भरून काढू शकते.

कव्हर्ड कॉल स्ट्रॅटेजीचा ( Covered call strategy ) मुख्य दोष म्हणजे शेअर्सच्या अचानक वाढलेल्या भावामुळे संभाव्य वरच्या नफ्यावर  मर्यादा येते. स्टॉकमध्ये लक्षणीय वाढ झाल्यास, गुंतवणूकदाराच्या नफ्याची क्षमता कॉल ऑप्शनच्या स्ट्राइक प्राइसमुळे मर्यादित केली जाते.

* बाजार जोखीम

कोणत्याही गुंतवणुकीच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे, कव्हर्ड कॉल हे देखील बाजारातील जोखमींपासून मुक्त नाही. ही स्ट्रॅटेजी अंमलात आणण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी बाजारातील परिस्थितीचे आणि त्या स्टॉकबद्दल  काळजीपूर्वक मूल्यांकन व अभ्यास केला पाहिजे.

शेअर बाजारातील आपली उपस्थिती कायम राखून नियमित उत्पन्न मिळवू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी कव्हर्ड कॉल स्ट्रॅटेजी हे एक शक्तिशाली साधन आहे. स्टॉकची मालकी आणि ऑप्शन्स ट्रेडिंगचे  (option trading ) मिश्रण, जोखीम आणि बक्षीस यांच्यातील समतोल प्रदान करते. तथापि, गुंतवणूकदारांनी ही स्ट्रॅटेजी (strategy) व  त्याचे संभाव्य फायदे आणि संबंधित जोखीम यांची स्पष्ट माहिती ठेऊनच ही स्ट्रॅटेजी ( strategy ) अमलात आणावी.

Leave a comment

Exit mobile version