परकीय चलन साठा म्हणजे देशाकडे असलेली परदेशी पैशाची ताकद ! ( Foreign Exchange Reserves ) यामुळे देश आर्थिक संकटातून बाहेर पडतो आणि आपलं चलन मजबूत ठेवतो. मे 2025 च्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातले सर्वात मोठे परकीय चलन साठे असलेले देश पाहूया. ही माहिती IMF, वर्ल्ड गोल्ड कौन्सिल आणि इतर विश्वासार्ह स्रोतांवरून घेतली आहे.
1. चीन: 3,571.80 अब्ज डॉलर
चीन आहे नंबर वन! यांच्याकडे 3,321.21 अब्ज डॉलर परकीय चलन आणि 250.59 अब्ज डॉलरचं सोनं आहे. व्यापार आणि गुंतवणुकीमुळे चीनचं खिसं नेहमी भरलेलं.
2. जपान: 1,238.95 अब्ज डॉलर
जपान दुसऱ्या नंबरवर! 1,178.73 अब्ज डॉलर परकीय चलन ( Foreign Exchange Reserves ) आणि 60.23 अब्ज डॉलरचं सोनं. निर्यातीमुळे जपानची तिजोरी भरपूर आहे.
3. स्वित्झर्लंड: 952.69 अब्ज डॉलर
स्वित्झर्लंड तिसऱ्या स्थानावर. 883.20 अब्ज डॉलर परकीय चलन आणि 69.50 अब्ज डॉलरचं सोनं. यांचं बँकिंग क्षेत्र आणि चलन यामुळे साठा मजबूत.
4. भारत: 690.62 अब्ज डॉलर
आपला भारत चौथ्या क्रमांकावर! 642.63 अब्ज डॉलर परकीय चलन आणि 47.99 अब्ज डॉलरचं सोनं (803.58 टन). 2024 मध्ये भारताने 100 टन सोनं परत आणलं. चांगली धोरणं आणि परदेशातून येणारा पैसा यामुळे भारत पुढे.
5. रशिया: 620.80 अब्ज डॉलर
रशियाकडे परकीय चलन आणि सोनं आहे. निर्बंध असूनही तेल आणि गॅसच्या निर्यातीमुळे हे पाचव्या स्थानावर.
6. तैवान: सुमारे 570 अब्ज डॉलर
तैवानकडे जास्तीत जास्त परकीय चलन आहे, सोनं कमी. तंत्रज्ञानाच्या निर्यातीमुळे सहावं स्थान.
7. सौदी अरेबिया: 458.11 अब्ज डॉलर
तेलामुळे सौदी अरेबियाकडे 436.53 अब्ज डॉलर परकीय चलन आणि 21.59 अब्ज डॉलरचं सोनं आहे.
8. हाँगकाँग: 425.55 अब्ज डॉलर
हाँगकाँगकडे 425.42 अब्ज डॉलर परकीय चलन आणि थोडं सोनं (0.14 अब्ज). वित्तीय केंद्र म्हणून आठवं स्थान.
9. दक्षिण कोरिया: 420.98 अब्ज डॉलर
दक्षिण कोरियाकडे 414 अब्ज डॉलर परकीय चलन आणि 0.10 अब्ज डॉलरचं सोनं. निर्यातीमुळे नववं स्थान.
10. सिंगापूर: सुमारे 370 अब्ज डॉलर
सिंगापूरकडे जास्त परकीय चलन, कमी सोनं. जागतिक वित्तीय केंद्र म्हणून दहावं स्थान.
काही खास गोष्टी:
IMF, वर्ल्ड गोल्ड कौन्सिल कडून ही माहिती वेळोवेळी प्रसारित केली जाते , हे विदेशी चलन मे 2025 पर्यंत 57.8% अमेरिकी डॉलरमध्ये, 19.83% युरोमध्ये, बाकी येन, युआन, पाउंड स्वरूपात साठवलेला आहे. चीन, भारत, रशिया यांनी बऱ्याच प्रमाणात सोनं हे परकीय चलन म्हणून साठवलेल दिसून येते.
परकीय चलन साठा ( Foreign Exchange Reserves ) दाखवतो देश किती श्रीमंत आणि ताकदवान आहे. चीन, जपान, स्वित्झर्लंड अव्वल आहेत, पण भारतही मागे नाही! यामुळे देश आर्थिक अडचणींना सामोरे जाऊ शकतात आणि जागतिक व्यापारात तग धरतात. सर्व जगाची नजर भारताच्या परकीय चलनावर आहे म्हणूनच तर भारताला सर्व देश शस्त्र, अत्याधुनिक साहित्य विकण्यासाठी नेहमी आग्रह करत असतात आणि म्हणूनच इतर देश भारताला एक उभरती अर्थव्यवस्था म्हणून ग्रहित धरतात.