Revolt RV400 | भारतातील पहिली संपूर्ण ऑटोमॅटिक व परवडणारी इलेक्ट्रिक मोटरसायकल.

रिव्हॉल्ट ( Revolt RV400 ) ही एक अशी इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे जी संपूर्ण ऑटोमॅटिक तर आहेच परंतु एक अद्वितीय राइडिंग अनुभव सुद्धा देते. ही बाईक तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत 1.39 लाखांपासून सुरू होते. बाईकची बॅटरी क्षमता 3.24 kWh असून तिचे वजन 115 kg आहे. सुरक्षिततेसाठी कॉम्बी ब्रेकींग सिस्टमसह डिस्क ब्रेक सिस्टम सुद्धा उपलब्ध आहे.

Revolt RV400 ची रचना 125cc मोटारसायकल सारखीच कामगिरी करण्यासाठी केली आहे. यात RV400 BRZ नावाचे एक नवीन मॉडेल सुद्धा आहे, जी वापरायला सोपी आणि नवीन EV रायडर्ससाठी उपलब्ध करून दिलेली आहे. Revolt RV400 सहा रंगांमध्ये तर BRZ मॉडेल पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे.

 72V 3.24 kWh लिथियम-आयन बॅटरीसह, RV400 इको मोडमध्ये 150 किमी पर्यंतची रेंज देते. ही बाइक 15A सॉकेट वापरून सुमारे 4.5 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होते. बाइकचा टॉप स्पीड 85 किमी प्रतितास आहे.

RV400 मध्ये 4G कनेक्टिव्हिटीसह LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, ज्यामुळे रायडर्स रिव्हॉल्ट ॲप वापरून ही बाइक त्यांच्या स्मार्टफोनवरून ऑपरेट करू शकतात. हे ॲप तुम्ही दिवसभर प्रवास कुठे केला आहे, बॅटरी हेल्थ, अजून किती किलोमीटर रेंज बाकी आहे आणि जवळचे स्वॅप स्टेशन जिथे तुम्ही बॅटरी बदलू शकता यासारखी माहिती देते. सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये जिओफेन्सिंग आणि कीलेस ऑपरेशन समाविष्ट आहे जिथे चाविची गरज नाही.

मजबूत ॲल्युमिनियम सबफ्रेम आणि स्विंगआर्मवर आधारित बॉडीसह RV400 मध्ये समोरच्या बाजूला इन्व्हर्टेड फोर्क आणि मागील बाजूस ॲडजस्टेबल सिंगल शॉकअप आहे. दोन्ही चाकांना 240mm डिस्क ब्रेक आणि CBS सिस्टिम उपलब्ध आहे. बाईकचा व्हीलबेस 1350mm, सीटची उंची 814mm, ग्राउंड क्लीयरन्स 215mm आणि वजन 108kg आहे.

    या बाईकची सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे यामध्ये उपलब्ध करून दिलेले वेगवेगळे आवाज, तुम्ही मोबाईलद्वारे बाईकला वेगवेगळे चार आवाज सेट करू शकता किंवा इतर इलेक्ट्रिक गाड्यांप्रमाने ते ऑफ पण करून ठेऊ शकता.

      RV400 ला जरी इलेक्ट्रिक बाइक मध्ये थेट स्पर्धक नसले तरी ते Ather 450X, TVS iQube Electric, Ola S1 Pro, आणि Bajaj Chetak सारख्या इतर इलेक्ट्रिक दुचाकींना टक्कर देते. एवढे सगळे फीचर असणारी दुसरी कोणतीही बाइक सध्या मार्केटमध्ये उपलब्ध नाही.  

Specification Detail
Battery  72V, 3.24 kWh
Max speed 85 km / hour
Range 150 km
Weight 108
Breaking Disc break
Charging time 4.5 hour
Connectivity 4g LTE
Price 139000 to 153000

 

एकूणच, रिव्हॉल्ट RV400 एक रोमांचक आणि टिकाऊ बाइकिंगचा अनुभव देते, ज्यामध्ये प्रत्येक आधुनिक फिचर्स, आणि क्षमता बजेटमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे.

अधिक माहितीसाठी कंपनीच्या  वेबसाइट ला भेट देऊ शकता.

https://www.revoltmotors.com/

Leave a comment

Exit mobile version