SUPER 30 | आता ऑनलाईन घेता येणार सुपर 30 सारखे शिक्षण, लवकरच करणार ऑनलाइन पोर्टल लॉन्च – आनंद कुमार

बिहारमधील पटना येथील प्रसिद्ध सुपर 30 ( super 30 ) चे संस्थापक आनंद कुमार यांनी आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू करणार असल्याचे एका मुलाखतीत सांगितले असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ कोचिंग दिली जाईल जेणेकरून जास्तीत-जास्त मुलांना भविष्यातील संधीचा वेध घेता येईल. आयआयटी-जेईई प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यात सुपर ३० च्या उल्लेखनीय यशानंतर ऑनलाईन माध्यमाद्वारे कोचिंग करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सुपर 30 ( super 30 Anand kumar ) वर चित्रपट बनण्यापासून आनंद कुमार ( Anand kumar ) चे नाव आज घराघरात पोहोचले आहे. जे गरीब विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये पटना येथे फ्री मध्ये IIT-JEE प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी शिक्षण देतात. 2003 ते 2017 दरम्यान, सुपर 30 मधील 450 पैकी 391 विद्यार्थ्यांनी IIT-JEE परीक्षा उत्तीर्ण केली आहे व आता त्यामधील भरपूर विद्यार्थी मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहेत, यामुळे सुपर 30 बॅच किती प्रसिद्ध आहे हे दिसून येते.

आनंद कुमारचे हे नवीन ऑनलाइन प्लॅटफॉर्म प्रतिभावान परंतु गरीब मुलांना संधी उपलब्ध करून देण्याची  गरज लक्षात घेऊन, शिक्षणाच्या व्यापक प्रसारासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने डिझाइन केलेला असेल. 2024 केलॉग इंडिया बिझनेस ( Kellogg India Business Conference 2024 ) कॉन्फरन्समधील भाषणादरम्यान त्यांनी आपली ही इच्छा व्यक्त केली, जिथे त्यांनी अत्यंत गरिबीमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात कसे परिवर्तन घडू शकते या गोष्टीवर भर दिला.

 

कोविड-19 मध्ये आपल्या जीवनावर कशाप्रकारे प्रभाव पडला व त्यामुळे विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यासाठी आणि ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर किती महत्त्वाचा ठरला या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांचा असा विश्वास आहे की गरीब पार्श्वभूमीतील अनेक हुशार मुलांकडे संधींच्या कमतरतेमुळे दुर्लक्ष केले जाते आणि म्हणूनच या ऑनलाइन शिक्षणाचा हेतू त्यांना ती संधी मिळावी म्हणून एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आहे.

कुमार यांनी शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहोचेल याची खात्री करण्याच्या गरजेवर भर दिला, विशेषत: सर्वात गरीब मुले ज्यांना वीज, शुद्ध पाणी आणि पुरेसे अन्न यासारख्या मूलभूत गरजा देखील मिळत नाहीत. तंत्रज्ञान हे अंतर भरून काढू शकते आणि याद्वारे गरीब मुलांना दर्जेदार शिक्षण मिळू शकते, असा त्यांचा विश्वास आहे.

शेवटी, कुमार यांनी नम्रपणे स्वतःला एक सामान्य शिक्षक म्हणून संबोधत, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाच्या सामर्थ्यावर यश मिळण्यास अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो परंतु चिकाटीने ते साध्य करता येते हे लक्षात घेऊन त्यांनी शिक्षणाद्वारे सामान्य व्यक्तींच्या जीवणामध्ये परिवर्तन घडवण्याचे ठरवले आहे.

Resource – https://timelinedaily.com/tag/2024-kellogg-india-business-conference

Leave a comment

Exit mobile version