8 वा वेतन आयोग ( 8th Pay Commission ) लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे 50 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 65 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होईल. या आयोगामुळे पगाररचनेत मोठे बदल होणार असून फिटमेंट फॅक्टर हा यामधील सर्वांत महत्त्वाचा घटक असेल.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय? ( Fitment Factor )
फिटमेंट फॅक्टर हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी वापरला जाणारा एक गुणांक आहे. 7 व्या वेतन आयोगात हा फॅक्टर 2.57 होता, तर 8 व्या वेतन आयोगात तो 2.86 पर्यंत असण्याची शक्यता आहे. यामुळे पगारात मोठी वाढ होईल हे नक्की. नवीन पगाराची गणना कशी होईल?
मूळ बेसिक पगार × फिटमेंट फॅक्टर = नवीन बेसिक पगार
उदा.: जर मूळ पगार ₹30,000 असेल, तर 2.86 फिटमेंट फॅक्टरने तो ₹85,800 होईल.
HRA आणि इतर भत्ते:
नवीन बेसिक पगारावरून घरभाडे भत्ता (HRA) आणि इतर भत्ते ठरवले जातील.
खरंच पगार 2.86 पटीने वाढेल का?
काही लोकांना वाटते की कर्मचाऱ्यांची एकूण पगार 2.86 पटीने वाढेल, परंतु हे सत्य नाही. इतिहास पाहता, एवढी मोठी वाढ होण्याची शक्यता मुळीच नाही.
भारताच्या इतिहासातील वेतन आयोगांनुसार झालेली पगारवाढ :
पहिला वेतन आयोग (1946-1947): सरासरी पगारवाढ 15-20%
दुसरा वेतन आयोग (1957-1959): सरासरी पगारवाढ 10-15%
तिसरा वेतन आयोग (1973): सरासरी पगारवाढ 20-25%
चौथा वेतन आयोग (1983-1986): सरासरी पगारवाढ 27-30%
पाचवा वेतन आयोग (1994-1997): सरासरी पगारवाढ 30-35%
सहावा वेतन आयोग (2006): सरासरी पगारवाढ 50-55%
सातवा वेतन आयोग (2016): सरासरी पगारवाढ 23-25%
8 व्या वेतन आयोगाची वैशिष्ट्ये: (8th Pay Commission)
1 किमान मूळ पगार ₹18,000 वरून ₹51,480 होण्याची शक्यता.
2 निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनात सुधारणा होईल.
3 भत्त्यांची रचना सध्याच्या प्रणालीप्रमाणेच राहू शकते.
8 व्या वेतन आयोगाने पगारवाढ कशी होईल?
7 व्या वेतन आयोगानुसार समजा एखाद्याचा मूळ बेसिक ₹30,000 आहे आणि जानेवारी 2026 पर्यंत त्याचा DA 63% झाल्यास जानेवारी 2026 पर्यंत त्याचा एकूण बेसिक ( Basic 30000+DA 18900 ) ₹48,900 असेल.
आता, जर 8 व्या वेतन आयोगाने ( 8th Pay Commission ) जरी 2.56 फिटमेंट फॅक्टर गृहीत धरला, तर:
₹30,000 × 2.56 = ₹76,800 एवढी पगारवाढ होणे अपेक्षित आहे.
महत्त्वाचा मुद्दा असा आहे की फिटमेंट फॅक्टर ( Fitment Factor ) फक्त मूळ बेसिक पगारावर लागू होतो आणि नवीन आयोग लागू झाल्यानंतर DA शून्य केला जातो. याचा अर्थ असा आहे की 8 वा वेतन आयोग लागू होण्याआधीच ₹30,000 बेसिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार जानेवारी 2026 मध्ये ₹48,900 पर्यंत पोहोचू शकतो आणि आयोग लागू झाल्यावर हाच पगार ₹76,800 च्या आसपास असेल. म्हणजेच, दोन्ही परिस्थितींमध्ये फरक ₹27,900 चा आहे.
एकूण पगारवाढ:
आकड्यांवरून असे दिसते की, एकंदरीत 50-55% पगारवाढ अपेक्षित आहे. मात्र, आजपर्यंतचा इतिहास पाहता फक्त सहाव्या वेतन आयोगातच एवढी मोठी वाढ झाली होती. सध्याच्या सरकारची आर्थिक परिस्थिती पाहता एवढी वाढ होईल का, याबाबत साशंकता आहे. यामुळे फिटमेंट फॅक्टर जर 2 च्या आसपास ठेवला गेला तर ही पगारवाढ 20 ते 22 टाक्यांच्या दरम्यान असू शकते.