Jogendranath Mandal | जोगेंद्रनाथ मंडल: पाकिस्तानात दलितांना वाऱ्यावर सोडणारा नेता.

जोगेंद्रनाथ मंडल ( Jogendranath Mandal ) या व्यक्तीबद्दल सांगायचे झाल्यास हे दलितांचे नेते म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात प्रसिद्ध होते. दलित समाजासाठी लढा देणारे आणि त्यांचे नेते म्हणून नावाजलेले मंडल यांनी फाळणीच्या वेळेस बंगाल मधील सर्व दलितांना पूर्व पाकिस्तानात (आताचे बांग्लादेश) राहण्यास भाग पाडले. मात्र त्यांचे काही निर्णय आजही वादग्रस्त ठरतात. त्यांच्या राजकीय स्वार्थ आणि चुकीच्या धोरणांमुळे पाकिस्तानातील दलित समाज अजूनही खितपत पडला आहे.

दलितांच्या भविष्याचा जोगेंद्रनाथ मंडल ( Jogendranath Mandal ) यांना विसर.

मंडल यांनी दलितांच्या हक्कांसाठी भारतात लढा दिला, परंतु त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपेक्षा मुस्लिम लीगसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा विश्वास होता की मुस्लिमांनी हिंदू उच्चवर्णीय वर्चस्वाला विरोध केला, मुस्लिम समाजात भेदभाव नाही, त्यामुळे पाकिस्तानात दलितांना अधिक चांगले भविष्य मिळेल. भारत स्वतंत्र होण्याअगोदर पूर्व बंगाल मधील हिंदुमध्ये जवळपास 60 ते 65% हिंदू हे दलित होते. फाळणीनंतर ते भारतात येऊ शकले असते परंतु काहीजण आर्थिक कारणाने व बाकीचे मंडल यांच्या सल्ल्यानुसार पाकिस्तानातच राहिले. आजही बांग्लादेशात राहणाऱ्या 7 ते 8% हिंदूंमध्ये जास्तीत जास्त दलित लोकांचा समावेश आहे.फाळणीच्या वेळेस पाकिस्तानातील बहुसंख्य तथाकथित उच्च वर्णीय भारतात परत आले परंतु मंडल यांनी दलितांना पाकिस्तानात राहण्याचा सल्ला दिला, जेणेकरून तिथे त्यांना समान हक्क मिळतील.

स्वतःचा राजकीय फायदा.

पाकिस्तानच्या स्थापनेनंतर मंडल ( Jogendranath Mandal ) यांना त्या देशाचे पहिले कायदा मंत्री बनवण्यात आले. हा पदभार त्यांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी स्वीकारला. त्यांनी मुस्लिम लीगचे नेते मोहम्मद अली जिना यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला, पण त्यांनी पाकिस्तानातील वाढत्या धर्मांधतेचा आणि हिंदू, दलितांवर होणाऱ्या भेदभावाचा अंदाज बांधला नाही.

मंडल यांचा स्वार्थी निर्णय.

जेव्हा पाकिस्तानात धार्मिक कट्टरता वाढू लागली आणि हिंदू, दलितांना दुय्यम नागरिक म्हणून वागवले जाऊ लागले, तेव्हा मंडल यांना त्यांच्या चुकांचा अंदाज आला. त्यांनी 1950 साली आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन ते भारतात परत आले. मात्र, त्यांनी पाकिस्तानात राहणाऱ्या दलित समाजाचा विचार केला नाही. ज्यांना त्यांनी पाकिस्तानात राहण्यास प्रोत्साहन दिले, त्यांना त्यांनी दुर्लक्षित केले व सर्वप्रथम स्वतः चा विचार केला

दलित समाजाचे संकट.

मंडल यांच्या परतण्यामुळे पाकिस्तानातील दलित समाज पूर्णपणे असुरक्षित बनला. तिथे त्यांना राजकीय संरक्षण आणि हक्कही मिळाले नाही. मंडल यांनी त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी दलितांना अडचणीत टाकले, असा आरोप त्यांच्यावर केला जातो.

पाकिस्तानातील मुस्लिम समाजाचे भेदभावपूर्ण वर्तन.

पाकिस्तानात मुस्लिम समाजाने इतर धर्मीयांवर आणि दलितांवर सातत्याने भेदभाव केला. धर्मांध विचारधारेमुळे हिंदू आणि दलित समाज सतत अडचणीत सापडला आहे. मंडल यांनी जे समतावादी पाकिस्तानचे स्वप्न पाहिले होते, ते पूर्णपणे फसवे ठरले.

जोगेंद्रनाथ मंडल यांची नकारात्मक भूमिका.

जोगेंद्रनाथ मंडल ( Jogendranath Mandal ) यांचा इतिहास हा स्वार्थी राजकारणाचे एक मोठे उदाहरण आहे. त्यांनी दलित समाजाला सुरक्षित भविष्याचे खोटे स्वप्न दाखवले आणि स्वतःसाठी सुरक्षित वाट मिळाल्यावर त्यांना सोडून दिले. त्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे आणि पाकिस्तानातील मुस्लिम बहुसंख्याक समाजाच्या भेदभावामुळे, आजही दलित समाजाला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कारण नैतिकदृष्ट्या मंडल त्यांनी तेथेच राहून दलितांच्या हक्कासाठी लढत राहायला पाहिजे होते कारण त्यांच्यामुळेच दलितांनी तेथे राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांनी तसे न करता आधी स्वतःचा विचार केला व तेथून निघून आले.

एकीकडे बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपले संपूर्ण जीवन दलितांच्या हक्कासाठी खर्च केले आणि दुसरीकडे जोगेंद्रनाथ मंडल ज्यांनी दलितांना वाऱ्यावर सोडले. यावरून असे दिसून येते की नेतृत्वात प्रामाणिकपणा आणि जबाबदारी महत्त्वाची असते. केवळ राजकीय स्वार्थासाठी घेतलेले निर्णय समुदायाच्या हिताला धोका पोहोचवू शकतात.

Leave a comment

Exit mobile version