Ayodhya Ram mandir donation | आता अयोध्या श्रीराम मंदिराला देणगी देऊन करू शकाल टॅक्स बचत.

अयोध्येतील राम मंदिराला एक श्रद्धा म्हणून तुम्ही जर देणगी देत असाल ( Ayodhya Ram mandir donation ) तर तुम्हाला याचा अजून एक फायदा होऊ शकतो तर तो म्हणजे तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये मिळणारी अतिरिक्त सूट. 1961 च्या आयकर कायद्यानुसार, कलम 80G अंतर्गत, पात्र धर्मादाय संस्थांना दिलेल्या देणग्यांवर तुम्हाला अतिरिक्त कर कपात मिळू शकते. तुम्ही एखादी व्यक्ती, कंपनी, फर्म किंवा लिमिटेड कंपनी असाल तरीही, तुम्ही कुठलेही निवासी असो, तुम्ही या तरतुदीचा फायदा घेऊ शकता.

* मान्यताप्राप्त ट्रस्ट आणि पात्र कपात

“श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट” हे एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण सार्वजनिक प्रार्थनास्थळ म्हणून केंद्र सरकारने अधिकृतपणे मान्यता दिली आहे. यामध्ये आर्थिक वर्ष 2020-21 पासून मंदिराचा जीर्णोद्धार किंवा दुरुस्तीसाठी मिळणाऱ्या देणग्या ह्या इन्कम टॅक्स च्या कलम 80G नुसार 50 टक्के वजावटीसाठी पात्र ठरतात.

यामध्ये हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त रकमेच्या वजावटीला परवानगी दिली जाणार नाही. जसे की, समजा तुमचे उत्पन्न वार्षिक 10 लाख आहे आणि वरील नियमानुसार तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या 10 पर्यंतची रक्कम टॅक्स सूट म्हणून दाखवू शकता जे की 1 लाख होईल. शिवाय, मंदिर दुरुस्ती आणि नूतनीकरणाव्यतिरिक्त इतर हेतूंसाठी देणग्या ( Ayodhya Ram mandir donation ) वजावटीसाठी पात्र ठरणार नाहीत.

* सूट साठी अटी

तुमच्या देणग्यांवर कर सवलतीचा दावा करताना, तुम्हाला काही अटी लक्षात ठेवायला हव्यात. 2,000 पेक्षा जास्त रोख देणग्या वजावटीसाठी पात्र असणार नाही. तुमची देणगी ( Ayodhya Ram mandir donation ) करवजावटीसाठी पात्र ठरण्याकरिता, ते फक्त अधिकृत ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे किंवा चेकद्वारे करणे आवश्यक आहे.

* कपातीचा दावा कसा करावा.

टॅक्स ब्रेकचा दावा करणे ही एक सरळ प्रक्रिया आहे. सर्वप्रथम, तुमची देणगी कर वजावटीकरिता पात्र आहे का याची खात्री करा, म्हणजेच ही देणगी नूतनीकरण किंवा दुरुस्ती साठी आहे का याची खात्री करा जे की तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर देणगी देताना कळेलच. त्यानंतर ‘श्री राम ट्रस्टकडून” तुम्हाला राम मंदिर देणगी म्हणून पावती मिळेल ती जपून ठेवाल.

यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे आयकर रिटर्न भरताना, जुन्या कर पद्धतीची निवड करणे आवश्यक आहे आणि टॅक्स रिटर्न फॉर्मच्या शेड्यूल 80G मध्ये तुमच्या देणगीचा तपशील द्या. कर कपातीचा दावा करण्यासाठी पुरावा म्हणून देणगीची पावती जपून ठेवा.

* योगदान करण्याचे मार्ग

 

राममंदिराच्या उभारणीसाठी हातभार लावण्याचे विविध मार्ग आहेत. यामध्ये ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ च्या अधिकृत वेबसाइटद्वारे     (Ayodhya Ram mandir donation website )  https://srjbtkshetra.org देणगी देणे व तुमचे नाव, पत्ता, देणगीचा उद्देश, पॅन आणि देणगीची रक्कम यासारखे तपशील त्यामध्ये द्यावे लागेल. देणगी देण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे जसे की ही वेबसाईट उघडल्यानंतर (Ayodhya Ram mandir donation website )  तिथे SBI आणि bank of Badoda या बँकेचे upi QR code दिसेल त्याला कोणत्याही upi ॲप मधून स्कॅन करून पैसे दान करू शकता.

देणगी दिल्यानंतर, पावतीची एक प्रत डाउनलोड करा आणि ती जपून ठेवा. तुम्‍हाला तुमच्‍या टॅक्स रिटर्नसाठी ती पावती अपलोड किंवा कुठे पाठवण्‍याची आवश्‍यकता नसली तरी, पावती हातात असल्‍याने समोर रिटर्नची प्रक्रिया पार पाडताना त्याची मदत होते.

* लक्षात ठेवण्यासाठी मुद्दे

1 अधिकृत संकेतस्थळ.. (Ayodhya Ram mandir donation website )

https://srjbtkshetra.org

वरील वेबसाईट ही अधिकृत आहे. फसवे व्यवहार टाळण्यासाठी अधिकृत वेबसाइटद्वारेच देणगी द्या.

2 रोख मर्यादा..

2,000 रुपयांपेक्षा जास्त रोख देणग्या कर कपातीसाठी पात्र नाहीत.

3 कपातीची टक्केवारी..

तुम्ही कलम 80G अंतर्गत मंदिराच्या नूतनीकरण/दुरुस्तीसाठी दिलेल्या देणग्यांसाठी तुमच्या करपात्र उत्पन्नातून 50 टक्के वजावटीचा दावा करू शकता. ही रक्कम तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 10 टक्के पेक्षा जास्त नसली पाहिजे.

4 पावती जपून ठेवा..

कर कपातीचा दावा करण्यासाठी पुरावा म्हणून देणगीची पावती जतन करा. शेवटी, राम मंदिरासाठी योगदान देणे केवळ तुमची भक्तीच दर्शवत नाही तर याद्वारे तुम्हाला कर फायदे देखील मिळू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आणि योग्य नोंदी ठेवून, तुम्ही तुमच्या देणगीसाठी उपलब्ध कर कपातीचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता.

Leave a comment

Exit mobile version