Battre storie electric scooter | भारतातील सर्वात मजबूत इलेक्ट्रिक स्कूटर, वाजवी किमतीमध्ये मिळणार अत्याधुनिक फीचर.

इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची म्हटलं तर आपल्याला बरेच प्रश्न पडतात, जसे की बॅटरीची वॉरंटी किती, गाडी टिकाऊ असेल की नाही, घेतल्यानंतर मेंटेनन्स कसा असेल, रेंज किती इत्यादी. परंतु आज आपण अशा स्कूटर बद्दल माहिती घेणार आहोत जे की भारतामधील सर्वात मजबूत इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून नावारूपास आलेली आहे. 

स्वदेशी बनावटीची ‘बॅटरी’ ही कंपनी सध्या खूप चर्चेचा विषय बनलेला आहे, याला कारणही तसेच आहे, या कंपनीचे ‘स्टोरी’ ( battre storie electric scooter) हे मॉडेल भारतातील सर्वात मजबूत इलेक्ट्रिक स्कूटर पैकी एक मानली जाते. या गाडीला असलेल्या मेटल पॅनल मुळे ही गाडी वजनदारच नाही तर मजबुत देखील आहे. या स्कूटरमध्ये सर्व अत्याधुनिक फीचर्स उपलब्ध आहेत जसे की कलरफुल डिस्प्ले, IP67 रेटींग असलेली मोटर आणि बॅटरी, USB चार्जिंग, रिव्हर्स मोड, पार्किंग मोड, साईड स्टॅन्ड सेंसर, हॅलोजन लॅम्प, इत्यादी.

 

इतर पेट्रोलच्या स्कूटर प्रमाणे दिसणाऱ्या या गाडीमध्ये ( battre storie electric scooter) टेलिस्कोपिक सस्पेन्शन, 180 mm चा ग्राउंड क्लिअरन्स, कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम, 257 किलो पर्यंत वजन वाहून नेण्याची क्षमता असे अनेक बाह्य वैशिष्ट्ये देखील आहेत.

या गाडीमध्ये खालील वैशिष्ट्ये आहेत..

Specification Detail
Scooter dimensions 1855×740×1175 mm
Kerb weight 106 kg
Mileage 132 kms per Charge (Eco Mode)
Payload capacity 257 kgs
Battery Lithium ion (NMC)
Battery IP rating IP67
Battery life 1200 cycles
Battery type 3.1 kWh (Removable)
Battery specification 60V / 52Ah
Charging time 5 hrs
Wheel base 1370 mm

 

 

Ground clearance 180 mm
Display 5 inch TFT Smart display
Warranty 3 year / 3000 kms
Prize 101999 (ex showroom)

 

 

या गाडीचे ( battre storie electric scooter) मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या स्कूटर मधील बॅटरीला आपण बाहेर काढून देखील चार्ज करू शकतो. या स्कूटरचा वेग 65 kms प्रति तास पर्यंतचा असून इको मोड वर ही 45 kms प्रति तास वेग गाठू शकते यामुळे ही घरातील महिलांना देखील सुरक्षित पर्याय म्हणून उपलब्ध आहे. ही स्कूटर मेटलची असल्यामुळे वजनदार तर आहेच पण यामध्ये चांगली रेंज देखील मिळते, या सर्व वैशिष्ट्यांमुळे ही स्कूटर इतर नावाजलेल्या ब्रँडची स्पर्धा करण्यास सक्षम आहे हे दिसून येते. वाजवी किमतीमध्ये एवढे फीचर मिळत असल्यामुळे या स्कूटरला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. 

अधिक महितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट देऊ शकता.

https://battre.in/models/storie/

Leave a comment

Exit mobile version