आजकाल ChatGPT हा खूप चर्चेचा विषय बनलेला आहे आणि तरीही तुम्ही याबद्दल जर ऐकलं नसेल किंवा ऐकलं असेल तरी वापरता येत नसेल, तर खरंच आजच्या आधुनिक युगात तुम्ही खूप मागे आहात यात काही शंका नाही.
आता थोडक्यात सांगायचं झालं तर ChatGPT म्हणजे असे सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये तुम्ही त्याला काहीही विचारू शकता. जसे की एखाद्या एक्सपर्टला एखाद्या समस्येबद्दल उपाय विचारल्यास तो जशाप्रकारे नेमका उपाय सांगतो अगदी त्यासारखच याचं पण आहे. आता समजा आपण यामधे तुम्ही टाईप केलं की ‘शिवाजी महाराजांबद्दल 350 शब्दांमध्ये भाषण तयार कर ज्यामध्ये त्यांच्या अग्ऱ्यामधील कैदेचे सविस्तर वर्णन असले पाहिजे’ झालं! अगदी 350 शब्दात तुम्हाला व्यवस्थित भाषण तयार करून मिळेल ते पण एका मिनिटात आणि हे वापरणे तितकेच सोपे आहे जसे तुम्ही व्हाट्सॲपवर एखाद्या मित्रासोबत मॅसेजद्वारे चॅट करता.
* ChatGPT नेमकं कशाप्रकारे काम करते
हे एक प्रकारचे सॉफ्टवेअर / टूल आहे ज्याने इंटरनेटवरील जवळपास सर्व माहिती वाचलेली आहे आणि रोज अपलोड होत असलेली सर्व भाषेतील नवनवीन माहिती नियमित वाचत असतो आणि आपण त्याला जर एखादा प्रश्न विचारला तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा ( Artificial Intelligence) चा वापर करून ज्याप्रकारे प्रश्न विचारला त्याप्रमाणे बरोबर उत्तर देतो आणि तुम्हाला समजणार सुद्धा नाही की हे उत्तर एखाद्या सॉफ्टवेअर ने दिलं असेल म्हणून. एवढे यथोचित उत्तर देण्यास हे सॉफ्टवेअर सक्षम आहे. हे सॉफ्टवेअर सध्या नवनवीन भाषा शिकत असून ज्याप्रमाणे आपण त्याला प्रश्न विचारतो त्याप्रमाणे उत्तर देण्याचा नियमित सराव करतो आणि यामुळे हे दिवसेंदिवस अधिक बुद्धिमान होत आहे.
आता तर ChatGPT- 4 नावाचे नवीन वर्जन आले आहे. त्यामध्ये तुम्हाला आश्चर्य होईल असे कार्य ChatGPT करू शकतो, जसे की समजा तुम्ही तर याला सांगितलं की ‘असे चित्र बनव ज्यामध्ये सूर्योदय होत असताना शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे घोड्यावर बसून रायगडाकडे जात आहेत’, तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही क्षणात हे सॉफ्टवेअर एक सुंदर चित्र तयार करून देइल. हे ChatGPT-4 वापरण्यासाठी काही चार्जेस लागतात परंतु यामधील काही फीचर्स फ्री मध्ये उपलब्ध आहेत. परंतु यामागील वर्जन फ्रीमध्ये उपलब्ध आहे. एक्सपर्टचे असे म्हणणे आहे की या सॉफ्टवेअरमुळे बऱ्याच लोकांचे जॉब जाऊ शकतात जसे की कंटेंट्स लिहिणारे ब्लॉगर्स, ॲनिमेशन इंडस्ट्री इत्यादी. बरीच क्षेत्रे यामुळे निश्चितच प्रभावित होईल. आता तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ बनवू शकणारे सुद्धा सॉफ्टवेअर विकसित होत आहेत यामुळे अजून काय काय होऊ शकेल हे सध्यातरी कल्पनेच्या पलीकडे आहे.
आता यालाच प्रतिस्पर्ता म्हणून गुगलने पण बार्ड ( bard ) नावाचे सॉफ्टवेअर लॉन्च केले आहे ज्याला आता Gemini असे नाव दिले आहे, जे की यासारखेच कार्य करते आणि त्यातील काही फीचर तर ChatGPT पेक्षाही ॲडव्हान्स असेल असं म्हटले जात आहे.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एवढे आधुनिक व क्रांतिकारी साधन आपल्याला जर वापरता आलं नाही तर नवीन पिढीच्या मानाने आपण किती मागे राहू याचा अंदाज न लावलेला बरा. हे सॉफ्टवेअर वापरायला खूप अवघड आहे असेही नाही.
* याचा वापर करणे अधिक सोयीचे का आहे?
तर बघा, एखाद्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शोधायचे असेल तर तुम्ही गुगल वर सर्च करता. त्यानंतर तुम्हाला शेकडो वेबसाईट दिसेल ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिलेले असेल. मग त्यापैकी सुरुवातीचे वेबसाईट उघडुन आपण आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु ChatGPT हे AI ( A Intelligence ) चा वापर करून नेमके उत्तर देण्याचा प्रयत्न करतो यामुळे वेळही वाचतो.
* आता हे कसं वापरता येईल? तर त्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.
1 सर्वप्रथम https://chat.openai.com या वेबसाईटवर जा (वरील लिंकला क्लिक करून सुद्धा जाता येईल)
2 यामधील होम पेजवर Sign up बटन दिसेल याला क्लिक करा तुम्हाला तिथे Create account दिसेल, त्यामध्ये तुमचा कोणताही एक ईमेल आयडी टाका आणि 12 अंकाचा एक पासवर्ड तयार करा.
3 यानंतर तुम्ही दिलेल्या ई-मेल ऍड्रेसवर एक ई -मेल येईल त्याला क्लिक करून व्हेरिफाय करा.
4 आता रजिस्टर केलेला ई-मेल ऍड्रेस आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
एवढं सोपं आहे या साइटवर जाऊन रजिस्टर ( Sign up ) करणे. तर मग चला आपणही काळाबरोबर राहून याचा हवा तसा वापर करून घेऊया.