Covishield side effects | तुम्ही कोविशिल्ड लस घेतली आहे का? लसीमुळे होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम..

आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये कोरोना मधील परिस्थिती कधीही न विसरण्यासारखी आहे. या काळात बहुतेकांनी आपल्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला जगाचा निरोप घेताना पाहिलं असेल. ही परिस्थिती आपल्या परिवारावर येऊ नये म्हणून आपण सर्वांनी कोविडची लस घेतलीच असेल. परंतु नुकतीच कोविड लसी संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे ‘कोविशिल्ड’ ( Covishield ) ही लस बनवणाऱ्या ब्रिटन मधील ॲस्ट्राजेनेका ( AstraZeneca ) कंपनीने पहिल्यांदा मान्य केले आहे की या लसीचे गंभीर साईड इफेक्ट ( covishield side effects ) होऊ शकतात. या साईड इफेक्ट्स मध्ये ब्लड क्लॉटिंग ( रक्त गोठणे ) सोबतच इतर गंभीर आजार होण्याच्या शक्यतेने या कंपनीवर ब्रिटनमध्ये केस देखील चालू आहे.

ब्रिटनमध्ये या कंपनीवर 51 केस दाखल केलेले आहेत. या वॅक्सीनमुळे गंभीर परिणाम झाल्याने बऱ्याच जणांनी जवळपास 1000 कोटीचा मोबदला कंपनीकडे मागितला आहे. भारतामध्ये जेवढ्या-काही लोकांना लसी दिल्या गेल्या आहेत त्यापैकी 80 टक्के लस्सी ह्या ‘कोविशिल्ड’ ( Covishield ) म्हणजेच ॲस्ट्राजेनेका ( AstraZeneca ) या कंपनीद्वारे तयार केल्या होत्या हे महत्वाचे. त्यामुळे भारतातील लोकांना देखील यासारख्या गंभीर आजारांची लक्षणे दिसण्याची शक्यता नकारता येत नाही.

ब्रिटनमधील दैनिकामध्ये एक लेख प्रकाशित झाला होता त्यामध्ये जेमि स्कॉट नावाच्या व्यक्तीने ॲस्ट्राजेनेका कंपनीवर केस दाखल केली होती त्यामध्ये या कंपनीची लस घेतल्यामुळे त्याला ब्रेन इंजुरी झाली आणि तो दवाखान्यात भरती होता. त्याला काही काम देखील करता येत नसे. एवढेच नाही तर तो एवढा गंभीर परिस्थितीत होता की त्यामुळे तो मरणार आहे म्हणून त्याच्या पत्नीला दवाखान्यातर्फे तीनदा कॉल सुद्धा आला होता. त्याला टीटीएस ( थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम ) नावाचा साईड इफेक्ट झाला होता ज्यात मेंदूमध्ये ब्लड क्लॉट्स बनतात आणि शरीरात प्लेटलेट्स ची संख्या देखील कमी होते. या ब्लड क्लॉट्स मुळे स्ट्रोक किंवा हृदयविकाराची संभावना असते.


फेब्रुवारीमध्ये ॲस्ट्राजेनेका कंपनीने कोर्टात काही डॉक्युमेंट्स जमा केले होते त्यामध्ये सुद्धा या कंपनीने सांगितले की कोविड वॅक्सीनमुळे टीटीएस ( TTS ) होण्याची शक्यता आहे परंतु याची शक्यता फार कमी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मागच्या वर्षी याच कंपनीने सामान्यतः टीटीएस (TTS) होण्याची शक्यता नाकारली होती.

       सुरुवातीपासूनच कोविशिल्ड लसीच्या साईड इफेक्ट ( Covishield side effects ) बद्दल वादविवाद दिसून येत होता परंतु त्या कंपनीने असे म्हटले की ट्रायल दरम्यान कोणताही साईड इफेक्ट पाहायला मिळाला नाही. या वॅक्सीनमुळे फक्त थोडा ताप आणि थकावट येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात परंतु कोणालाही गंभीर आजार होणार नाही असे कंपनीने म्हटले होते.


भारतात ही लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने तयार केली आहे. लस बाजारात येण्यापूर्वीच SII ने AstraZeneca सोबत करार केला होता.सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. भारतात सुमारे 80 टक्के लसीचे डोस फक्त कोविशील्डचे आहेत जे की हीच कंपनी बनवते आणि भारताने बऱ्याच प्रमाणात इतर देशात याची निर्यात देखील केली होती. परंतु बऱ्याच एक्सपर्टचे म्हणणे आहे या लसीचे दुष्परिणाम ( Covishield side effects ) होण्याची शक्यता फार कमी असल्याने याबाबत कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे होईल. शासनातर्फे सुद्धा याबाबत पुढील गाईडलाईन प्राप्त होईपर्यंत वाट पहावी लागेल.

Leave a comment

Exit mobile version