DA and HRA hike | केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, DA आणि HRA मध्ये मोठी वाढ..

नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA आणि HRA मध्ये मोठी वाढ केली आहे. यामध्ये DA ( Dearness allowance ) आणि DR ( Dearness relief ) तब्बल 4% ने वाढवण्याचा ( DA and HRA hike ) निर्णय घेण्यात आलेला आहे यामुळे DA हा 46% वरून 50% होईल. सोबतच ग्रॅज्युएटीची टॅक्स सूट मर्यादा 20 लाखावरून 25 लाख करण्यात आलेली आहे आणि मुख्य म्हणजे शासनाने यावेळेस HRA मध्ये देखील वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये राहत असलेल्या शहरानुसार 1%  ते  3% पर्यंत वाढ होणार आहे. 

HRA करिता शहरानुसार X, Y, Z झेड अशी कॅटेगिरी करण्यात आलेली यामध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात आला आहे.

कॅटेगरी   झालेला बदल
X 27% वरून 30%
Y 18% वरून 20%
Z 9% वरून 10%

 

यामुळे केंद्रशासनावर अतिरिक्त 9000 कोटी चा बोजा पडणार आहे.

* प्रत्येक कॅटेगरी मध्ये येणाऱ्या शहरांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

X श्रेणीमध्ये-

दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता यांना एक्स श्रेणीत ठेवण्यात आले आहे. या शहरांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 30% टक्के HRA मिळणार आहे.

Y श्रेणीत-

Y श्रेणीमध्ये पाटणा, लखनौ, विशाखापट्टणम, गुंटूर, विजयवाडा, गुवाहाटी, चंदीगड, रायपूर, राजकोट, जामनगर, वडोदरा, सुरत, फरिदाबाद, गाझियाबाद, गुडगाव, नोएडा, रांची, जम्मू, श्रीनगर, ग्वाल्हेर, इंदूर, भोपाळ ही शहरे आहेत. , जबलपूर, उज्जैन, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, सांगली, सोलापूर, नाशिक, नांदेड, भिवडी, अमरावती, कटक, भुवनेश्वर, राउरकेला, अमृतसर, जालंधर, लुधियाना, बिकानेर, जयपूर, जोधपूर, कोटा, अजमेर, मुरादाबाद, मेरैली , अलीगढ, आग्रा, लखनौ, कानपूर, अलाहाबाद, गोरखपूर, फिरोजाबाद, झाशी, वाराणसी, आणि सहारनपूर. या शहरांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 20% टक्के HRA मिळणार आहे.

Z श्रेणीमध्ये-

X आणि Y श्रेणीतील शहरांव्यतिरिक्त इतर सर्व शहरांना Z श्रेणीत ठेवण्यात आले आहे. या शहरांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 10% टक्के HRA मिळणार आहे.

शहराची कॅटेगरी शासनाच्या खालील लिंक वरून बघता येईल.

https://mod.gov.in/dod/sites/default/files/hra.pdf

 

Leave a comment

Exit mobile version