PM Surya Ghar Yojana | आता वीजबिल होईल झीरो, जाणून घ्या काय आहे योजना..

लोकसभेमध्ये नुकतीच पी एम सूर्य घर ( PM Surya Ghar Yojana ) योजना या योजनेला मंजुरी मिळाली आहे. यामध्ये आपल्या घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी बंपर सबसिडी मिळणार आहे आणि त्यासाठी शासन तब्बल 75021 करोड खर्च करणार आहे. या योजनेमुळे जवळपास 1 करोड लोकांना लाभ मिळणार आहे ज्यांच्या खात्यावर सबसिडी ची रक्कम लगेच जमा केली जाणार आहे. या योजनेमध्ये सर्वसामान्यांना खूप कमी व्याजदरामध्ये कोणतेही तारण न ठेवता कर्ज देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे.

* योजनेतील महत्त्वाचे मुद्दे..

1. सबसिडीची रक्कम.

या स्कीम मध्ये केंद्रशासनातर्फे खालील प्रमाणे सबसिडी मिळणार आहे.

1 kW सिस्टीम साठी 30,000 रू.
2 kW सिस्टीम साठी 60,000 रू.
3 kW सिस्टीम साठी 78,000 रू.

2. अर्ज प्रक्रिया.

आपल्या घरावर सोलर पॅनल इन्स्टॉल करण्यासाठी केंद्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज करू शकता ज्यामधे आपल्याला जवळील व सोयीचा असलेला विक्रेता निवडता येणार आहे.

3. कमी व्याजदर.

यामध्ये शासन आर्थिक सहाय्य देखील करणार आहे ज्यामध्ये कोणतेही तारण नसलेले सर्वात कमी व्याजदर असलेलं कर्ज जे की 7% च्या आसपास असेल ते आपल्याला इंस्टॉल करताना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

4. आदर्श सोलर गाव.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ‘आदर्श सोलर गाव’ निर्माण केले जाणार आहे ज्यामुळे इतर गावांना प्रेरणा मिळेल व या योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळेल.

5. राष्ट्रीय ऑनलाईन संकेतस्थळ.

या संकेतस्थळावर सर्व विक्रेत्यांची नोंदणी व सबसिडीची याबाबत सुलभ प्रक्रिया उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्यामुळे अर्ज करणे प्रत्येकाला सोयीचे होईल.

* अर्ज कसा करावा..

1. सर्वप्रथम खालील संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

https://pmsuryaghar.gov.in

ज्यामध्ये आपले राज्य, वीज वितरण कंपनी, आपला ग्राहक क्रमांक, मोबाईल नंबर व ई-मेल हे नोंद करणे आवश्यक राहील.

2. यानंतर आपल्या मोबाईल नंबर व ओटीपीद्वारे लॉगिन करून या स्कीम साठी अर्ज करता येणार आहे.

3. नोंदणी केलेली माहिती वेरिफाय झाल्यानंतर पोर्टलवर व वीज वितरण कंपनीद्वारे नोंदणी झालेल्या विक्रेत्याद्वारे लगेच प्लांट इंस्टॉल केला जाईल.

4. यानंतर इंस्टॉल झालेल्या प्लांट ची माहिती सबमिट करून नेट मीटर साठी मागणी होईल.

5. नेट मीटर इन्स्टॉल झाल्यानंतर वितरण कंपनी द्वारे तपासणी होईल व नंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र दिले जाईल.

6. शेवटी तुमचे बँक अकाउंट ची माहिती व एक कॅन्सल चेक पोर्टलवर अपलोड करावा लागेल जेणेकरून तीस दिवसाच्या आत सबसिडीची रक्कम तुमच्या बँक खात्यावर जमा होईल.

 

* वितरण कंपनीची जोडलेले रूफ-टॉप सोलर सिस्टिम चे फायदे. ( PM Surya Ghar Yojana )

– तुमच्या वीज बिलावर मोठ्या प्रमाणात बचत.

– रिकामी असलेली तुमच्या छतावरील जागेचा वापर झाल्यामुळे अतिरिक्त जागेची आवश्यकता राहणार नाही.

– वीज वाहून नेण्यासाठी अतिरिक्त तारेच्या वितरणाचा खर्च वाचेल.

– वीज निर्मिती जागेवरच होत असल्याने वीज वहनांमध्ये होणारी गळती बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

– वीज निर्मितीमध्ये होणारे कार्बन उत्सर्जन थांबून प्रदूषण कमी होईल.

– दिवसभरात निर्माण होणाऱ्या अतिरिक्त विजेचा चांगल्या प्रकारे वापर वितरण कंपन्याद्वारे केला जाईल.

असे म्हटले जात आहे की या स्कीम मुळे उत्पादन, पुरवठा, वितरण साखळी, विक्री, इन्स्टॉलेशन आणि इतर सेवेद्वारे जवळपास 17 लाख रोजगार निर्मिती करण्याची क्षमता निर्माण होईल.

पी एम सूर्य घर  ( PM Surya Ghar Yojana ) ही 2030 पर्यंत भारताला 500 GW अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता प्राप्त करून देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, ज्यामुळे फ्री मध्ये भारतीयांना वीज उपलब्ध होईल.

2 thoughts on “PM Surya Ghar Yojana | आता वीजबिल होईल झीरो, जाणून घ्या काय आहे योजना..”

Leave a comment

Exit mobile version