गुंतवणूकदार सतत गुंतवणुकीसाठी विविध पर्याय शोधत असतात. यामधे सर्वात जास्त परतावा कशात मिळेल त्यात ते गुंतवणुकीला प्राधान्य देतात, परंतु ज्यांना इन्कम टॅक्स भरावा लागतो त्यांना जुन्या कर पद्धतीनुसार कर वाचवायचा असल्यास विविध पारंपरिक पर्याय उपलब्ध आहेत जसे की PPF, सुकन्या समृद्धी योजना, LIC, पोस्टल लाईफ इन्शुरन्स इत्यादी. त्यामुळे त्यांची संपत्ती तर निर्माण होतेच पण यामधे नियमित परतावा व कर-बचतीचे फायदे देखील मिळतात. परंतु या पर्यायांमध्ये परतावा 8 ते 8.5 टक्यांपर्यंत मर्यादित आहे..
आज इथे कमी चर्चित अशा एका पर्यायाचा आपण विचार करणार आहोत ज्याने चक्क दोन ते तीन वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. तो पर्याय म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स (ELSS). ईएलएसएस फंड ( ELSS Funds ) हा एक प्रकारचा इक्विटी म्युच्युअल फंड आहे जो जास्त रिटर्न्स तर देतोच पण त्यामध्ये आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत टॅक्स मध्ये सूट देखील मिळते.
• ELSS फंड म्हणजे काय.?
हे फंड बाकी म्युच्युअल फंडासारखेच असतात, फक्त यात मुख्य फरक म्हणजे यामधे असणारे 3 वर्षांचे लॉक इन पिरियड. ईएलएसएस फंड ( ELSS Funds ) प्रामुख्याने इक्विटी किंवा इक्विटी-संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करतात, त्यामुळे ते शेअर बाजारातून जास्त परतावा मिळवून देण्यास सक्षम असतात. ईएलएसएस फंड ( ELSS Funds ) चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यामुळे होणारी कर-बचत, जे गुंतवणूकदारांचे तीस हजारांपर्यंत टॅक्स वाचवू शकते कारण यामधे गुंतवणूक करून दीड लाखांपर्यंत तुम्ही 80C कलमामध्ये गुंतवणूक करू शकता.
• ईएलएसएस फंड ( ELSS Funds ) कसे काम करतात.?
ELSS फंडामध्ये गुंतवणूक केलेली रक्कम शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट केली जाते आणि ही गुंतवणूक एका प्रोफेशनल द्वारे केली असल्यामुळे रिस्क मॅनेजमेंट, गुंतवणुकी बाबतीत योग्य निर्णय, या सर्व गोष्टी पद्धतशीरपणे केल्यामुळे मार्केटमध्ये असणारी रिस्क आपोआप कमी होते. कंपन्यांच्या समभागांमध्ये वेगवेगळ्या सेक्टरच्या कंपन्या काळजीपूर्वक निवडले जातात. ईएलएसएस फंड ( ELSS Funds ) तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह येतात, ज्यामुळे गुंतवणूकदार दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत राहतील याची खात्री असते आणि यामुळे आपल्यामध्ये शिस्त देखील निर्माण होते.
• ELSS म्युच्युअल फंडाची वैशिष्ट्ये..
- कलम 80C अंतर्गत वार्षिक करपात्र उत्पन्नातून दीड लाख रुपयापर्यंत सूट.
- तीन वर्षांचा अनिवार्य लॉक-इन कालावधी.
- इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्यपूर्ण गुंतवणूक.
उदाहरणासाठी काही फंड व त्यांचा वार्षिक परतावा खाली दिलेला आहे.
Funds | 3y | 5y |
Quant Tax Plan Direct-Growth | 35.58 | 35 |
Mirae Asset Tax Saver Fund Direct-Growth | 19.20 | 21.93 |
Parag Parikh Tax Saver Fund Direct-Growth | 24.67 | – |
Kotak ELSS Tax Saver Fund Direct-Growth | 22.12 | 21.37 |
DSP Tax Saver Direct-Growth | 22.35 |
22.36 |
Canara Robeco ELSS Tax Saver Direct-Growth | 17.94 | 21.37 |
Axis Long Term Equity Direct-Growth | 10.67 | 15.68 |
• गुंतवणूक कशी करावी.?
ईएलएसएस फंड ( ELSS Funds ) मध्ये गुंतवणूक करणे सोपे आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म जसे की GROWW, INDmoney, Kuvera , Paytm Money, ET Money इत्यादी अशा सुरक्षित ॲप द्वारे किंवा बँक, डीमॅट अकाउंट, रजिस्ट्रार किंवा एजंट यांसारख्या विविध माध्यमांद्वारे केली जाऊ शकते. जवळपास सर्व ELSS फंडांमध्ये तुम्ही कमीतकमी 500 ते 1000 पासून गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकता. यामध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे किंवा एकरकमी देखील गुंतवणूक करता येते. SIP ही एक लोकप्रिय पद्धत आहे कारण ते गुंतवणूकदारांना नियमितपणे व कमी पैशांमध्ये गुंतवणूक करण्यास सुविधा देते.•
• ELSS मधील नफ्यावर टॅक्स बाबत नियम
ईएलएसएस फंड ( ELSS Funds ) मध्ये दीर्घकालीन भांडवली नफा (LTCG) अंतर्गत वर्षाला १ लाख रुपयापर्यंतचा नफा करमुक्त आहे. LTCG मध्ये 1 लाखांपेक्षा जास्त नफ्यावर 10% टॅक्स आकारला जातो.
ईएलएसएस फंड ( ELSS Funds ), टॅक्स सेविंग पर्यायांमध्ये सर्वात जास्त परतावा देणारा पर्याय आहे. यामध्ये पारंपारिक कर-बचत साधनांच्या तुलनेत सर्वात कमी लॉक इन व जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. तुम्ही यामध्ये कितीही गुंतवणूक करू शकता परंतु 80C अंतर्गत 1.5 लाखापर्यंत टॅक्स लाभ घेऊ शकता.
शेवटी, ELSS फंड हे दीर्घकालात संपत्ती वाढवू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आकर्षक गुंतवणूक पर्याय आहे. उच्च परतावा आणि कर-बचत फायद्यासाठी, ईएलएसएस फंड ( ELSS Funds ) कोणत्याही गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये एक महत्त्वाचे साधन ठरू शकते.