Cheap home loan interest rate | आता होम लोनवर द्या सर्वात कमी व्याज, या उपायाने होईल होम लोन अधिक स्वस्त.

आपल्या सर्वांचे स्वप्न असते की आपलं एक सुंदर घर असावं. लहान शहरांमध्ये लोकं सहसा छोटा का होईना पण एखादा प्लॉट घेऊन घर बांधणे पसंत करतात पण हेच जर मेट्रो शहरांमध्ये घ्यायचं झालं तर ते सामान्य व्यक्तींच्या अवाक्याबाहेर असते म्हणून तिथे लोक फ्लॅट घेणे पसंत करतात.

घर म्हटलं तर सर्वात मोठा प्रश्न असतो ते म्हणजे एकरकमी मोठी रक्कम आणि त्याकरिता सर्वसामान्य व्यक्तीसमोर एकच पर्याय असतो तो म्हणजे होम लोन. आज भारतामध्ये होम लोन हा एकच पर्याय आहे ज्यामध्ये सर्वात कमी व्याजदर असतो ( Cheap home loan interest rate ) आज बँक होम लोन साठी 8.4 ते 9.5 टक्यांपर्यंत व्याजदर आकारते आणि हे आपल्या सिबिल स्कोर वर अवलंबून आहे. हा व्याजदर अजून कमी करायचा झाल्यास त्यासाठी एक भन्नाट उपाय आहे ते म्हणजे मनी सेव्हर होम लोन. याला कोणी महा सुपर फ्लेक्सी होम लोन म्हणतात तर कोणी सेविंग लिंक होम लोन असेही म्हणतात परंतु या सर्वांचा अर्थ एकच ते म्हणजे सेविंग अकाउंट आणि होम लोन या दोघांचं कनेक्शन, ते कसं?? तर पाहूया हे काय असतं.

मनी सेव्हर होम लोन ( money saver home loan ) म्हणजे काय?

याचा साधा सरळ अर्थ असा आहे की समजा, तुम्ही एखाद्या बँकेकडून होम लोन घेतलं आणि हे लोन घेतल्यानंतर बँक आपल्याला त्याला जोडूनच एक बचत ठेव खाते उघडण्यास सांगते. बँकेकडून हे लोन खाते आणि तुमचं नवीन उघडलेलं बचत खातं हे एकमेकांना जोडलेलं असतं.

समजा तुम्ही बँकेकडून 25 लाख रुपये होम लोन म्हणून घेतलं, आता काही महिन्यानंतर तुमच्याकडे 2 लाख रुपये एकरकमी आले आणि जर तुम्ही ते पैसे तुमच्या होम लोनला जोडलेल्या बचत खात्यामध्ये ठेवलात तर बँक तुमच्या होमलोनमधून ती रक्कम कपात करते व उर्वरित रकमेवर व्याजदर चालू ठेवते. हे दोन लाख रुपये जेवढे दिवस तुमच्या बचत खात्यामध्ये असेल, तेवढे दिवस बँक त्या दोन लाखावर होमलोनचे व्याज आकारणार नाही आणि हे पैसे नेहमीसारखे तुम्ही आपल्या बचत खात्यामधून केव्हाही काढू शकता आणि जेवढी रक्कम तुम्ही त्या खत्यातून काढल तेवढ्या रकमेवर व्याज पुन्हा चालू होईल. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की तुमच्याकडील अतिरिक्त पैशाने लोनची परतफेड न करता त्यावर तुम्ही होमलोनचे व्याज वाचवू शकता ( Cheap home loan interest rate ).

ही सुविधा बऱ्याच बँकेमध्ये उपलब्ध आहे जसे की आयसीआयसीआय बँकेमध्ये याला मनी सेव्हर होम लोन, बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये याला महा सुपर फ्लेक्सी होम लोन, ॲक्सिस बँकेत सुपर सेव्हर होम लोन म्हणून ओळखली जाते आता एचडीएफसी बँक सुद्धा सेविंग लिंक होम लोन म्हणून ही सुविधा सुरू करणार आहे.

आता याचा फायदा म्हणजे, सर्व बँक तुम्हाला सेवींग खात्यावर 3.5 ते 4 टक्के व्याज देते, जर तेच पैसे तुम्ही होम लोनशी लिंक असलेल्या सेविंग खात्यामध्ये ठेवलात तर त्यामुळे तेवढ्याच पैशावर होमलोनवर लागणारे व्याज जे की 8.4 ते 9.5 टक्के असते ते लागणार नाही. याचा अर्थ असा की तुमच्या त्या सेविंग खात्यावर 8 टक्यांच्या वर व्याज मिळाले असे आपण गृहीत धरू शकतो. म्हणून होमलोन घेताना या बाबीचा विचार नक्की कराल जेणेकरून तुम्हाला होमलोनवर जास्तीत जास्त व्याज वाचवता येईल.

1 thought on “Cheap home loan interest rate | आता होम लोनवर द्या सर्वात कमी व्याज, या उपायाने होईल होम लोन अधिक स्वस्त.”

Leave a comment

Exit mobile version