अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील मराठा समाज सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाच्या मागणीत आघाडीवर आहे. तथापि, राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी (EWS) आरक्षणाचे सर्वात मोठे लाभार्थी मराठा आधीच आहेत असे आकडेवारीवरून दिसून येते. यामुळे EWS कोट्याद्वारे समाजाला मिळणाऱ्या महत्त्वपूर्ण फायद्यावर विचार करायला हवा. ज्या उद्देशाने मराठा समाज OBC आरक्षणासाठी ( Maratha reservation ) झटत आहे, त्यामुळे खरंच त्यांना लाभ होईल का तोटा यावर देखील चर्चा व्हायला हवी..
केंद्राने 2019 मध्ये SC, ST, आणि OBC आरक्षणासारख्या इतर कोट्यांचा लाभ न घेतलेल्या आणि 8 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या समाजातील घटकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी 10% EWS कोटा सुरू केला होता. महाराष्ट्रात, EWS कोटा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी एक महत्त्वाचा मार्ग म्हणून उदयास आला आहे, या लाभार्थ्यांमध्ये मराठा लोकांचा वाटा सर्वात मोठा आहे.
2022 मध्ये सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे (CET) महाराष्ट्रातील EWS कोट्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाबाबतच्या आकडेवारीवरून असे दिसून आले की 78.6% उमेदवार मराठा समाजाचे होते. एकूण 20,117 प्रवेशांपैकी, अंदाजे 15,807 मराठा समाजातील होते, तर केवळ 4,310 इतर समाजातील होते. त्याचप्रमाणे, 2023 मध्ये, एकूण 11,302 प्रवेशांपैकी 76.7% EWS कोट्यातील प्रवेश मराठा समाजाचे होते.
2019 आणि 2022 दरम्यान EWS द्वारे भरलेल्या राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये, मराठा समाजातील उमेदवारांनी संख्या 84.3% होती यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) EWS कोट्यातून भरलेल्या 650 नोकऱ्यांपैकी 548 मराठा समाजातील उमेदवारांकडे गेल्या, तर फक्त 102 इतर समाजातील होत्या.
या आकडेवारीवरून EWS आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला मिळणारा महत्त्वाचा फायदा दिसून येतो व समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांची प्रगती करणाऱ्या या धोरणाचे प्राथमिक लाभार्थी मराठा असल्याचे स्पष्ट होते. तथापि, EWS आरक्षणाच्या फायद्यांबाबत समाजामध्ये व्यापक जागरूकता होण्याची गरज आहे.
राहिला प्रश्न ओबीसी कोट्याचा, तर महाराष्ट्रात OBC व EWS या दोन्ही संवर्गाचे कट ऑफ मार्क्स हे जवळपास सारखेच असतात आणि दोघांना सारख्याच पातळीवर आरक्षण आहे जसे दोघांना पण क्रीमीलेयर ची आवश्यक आहे व त्याची मर्यादा ही देखील सारखीच आहे आणि मराठा समाज हा OBC मध्ये समाविष्ट नसताना ही स्थिती आहे .. जर समजा महाराष्ट्रात अंदाचे 28% जनसंख्या असलेला हा समाज OBC मध्ये गेल्यावर OBC ची मेरिट लिस्ट खुल्या संवर्गाबरोबर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि यामुळे EWS मधील स्पर्धा कमी होऊन उर्वरित खुल्या प्रवर्गातील लोकांना याचा फायदा होईल कारण एकदा हा समाज OBC मध्ये गेला तर त्यांना EWS कोट्यावर हक्क सांगता येणार नाही आणि त्यांना जो फायदा होणे अपेक्षित आहे ते न होता नुकसानच होण्याची भीती जास्त असेल कारण इथे EWS च्या माध्यमातून 8% जागा का होईना त्यांना अप्रत्यक्षपणे मिळत आहे तिथे त्यांना ते पण मिळणार नाही कारण OBC समाज हा आज बऱ्यापैकी प्रगत झाला आहे व यामधे बऱ्याच जाती असल्याने OBC संवर्गातील अंतर्गत स्पर्धेला त्यांना तोंड द्यावे लागेल.
आता तर शासनाने मराठ्यांना 10% वेगळं आरक्षण ( Maratha reservation ) दिलेलं आहे जे की सुप्रीम कोर्टात टिकणे खूप अवघड असेल, हे बघून शासनाने निवडणुका लक्षात घेऊन तात्पुरती मलमपट्टी केलेली दिसते. पण यामुळे त्यांना EWS व OBC या दोन्हींवर हक्क सांगता येणार नाही आणि निकाल लागेपर्यंत भरती होईलच याची शास्वती देखील नाही.. याचाच अर्थ मराठा समाज एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपला आहे जिथे निश्चित दिशा ठरवणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि ही दिशाच मराठ्यांचे भविष्य निर्धारित करेल यात शंका नाही.
OBC मधील स्पर्धा यापूर्वी लागलेल्या निकालामधून दिसून येते. https://byjus.com/govt-exams/mpsc-cut-off/
Relastic माहिती व परिपूर्ण अभ्यासाअंती लिहिलेला लेख खूप छान पुढील लेखाची आतुरतेने वाट पहातो