What is APAAR ID | APAAR ID म्हणजे काय? महाराष्ट्रातील सर्व शाळांना विद्यार्थ्यांची नोंदणी 30 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांना APAAR ID (Automated Permanent Academic Account Registry) साठी विद्यार्थ्यांची नोंदणी 30 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील केवळ 65 लाख विद्यार्थी, म्हणजेच एकूण विद्यार्थ्यांपैकी फक्त 35% विद्यार्थ्यांना APAAR ID जारी करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर 29 व 30 नोव्हेंबर हे “APAAR ID दिवस” म्हणून साजरे करण्याचे ठरवले आहे.

APAAR ID म्हणजे काय?

APAAR ID हा 12-अंकी युनिक कोड आहे, जो विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक दस्तऐवज डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवण्यासाठी, व्यवस्थापित करण्यासाठी व कोणत्याही अभ्यासक्रमात सहजपणे प्रवेश करण्यासाठी मदत करतो. यामध्ये मार्कशीट, प्रमाणपत्रे, पदवी व इतर सह-शैक्षणिक उपलब्धिचा समावेश होतो.

हे डिजिटल ओळखपत्र विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुलभ करण्यासाठी तसेच शैक्षणिक क्रेडिट ट्रान्सफर व प्रगत शिक्षणासाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर कुठेही ॲडमिशन घ्यायचे झाल्यास कोणतीही अडचण येणार नाही कारण ही आयडी तुमचा सर्व शैक्षणिक प्रवास एका क्लिकवर संबंधित संस्थेला प्राप्त होणार आहे.

APAAR ID कसा मिळवावा?

1. नोंदणी व पडताळणी: विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन आपली वैयक्तिक माहिती तपासून घ्यावी.

2. पालकांची संमती: अल्पवयीन विद्यार्थ्यांसाठी पालकांची संमती आवश्यक आहे.

3. प्रमाणित करणे: शाळा विद्यार्थ्यांची माहिती प्रमाणित करतील.

4. ID तयार करणे: एकदा माहिती प्रमाणित झाल्यानंतर APAAR ID तयार होईल व ती विद्यार्थ्याच्या DigiLocker खात्याशी जोडली जाईल.

नोंदणीसाठी विशेष मोहीम

29 व 30 नोव्हेंबर रोजी राज्यभरात “APAAR ID दिवस” साजरे केले जातील. या दिवसांमध्ये शिक्षणाधिकारी, ब्लॉक शिक्षणाधिकारी व क्लस्टर प्रमुखांच्या सहकार्याने विशेष मोहीम राबवली जाईल. निरीक्षक शाळांना भेट देऊन प्रगतीचा आढावा घेतील.

UIDSE+ पोर्टलवर स्टेटस तपासा

विद्यार्थ्यांना त्यांचे APAAR ID तयार झाले आहे का, हे तपासण्यासाठी UDISE+ पोर्टलवरील APAAR मॉड्यूल वापरता येईल किंवा शाळेकडून माहिती मिळवता येईल.

केंद्रशासनाचे महत्त्वाचे पाऊल

राज्याचे समग्र शिक्षा अभियान संचालक आर. विमला यांनी सांगितले की, जिल्हास्तरीय ऑनलाइन पुनरावलोकन बैठका आयोजित करून या प्रक्रियेचा आढावा घेतला जाईल व मार्गदर्शन केले जाईल. जिल्हा व ब्लॉक पातळीवरील अधिकारी दररोज अहवाल देऊन नोंदणी प्रक्रियेला गती देतील.

“One Nation One student Id” उपक्रमाच्या यशासाठी महाराष्ट्र सरकारने या मोहिमेला प्राधान्य दिले आहे व सर्व संबंधितांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a comment

Exit mobile version